रोटेगाव – परसोडा रेल्वेस्थानक दरम्यान 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला

वैजापूर,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-रोटेगाव ते परसोडा रेल्वे स्थानकादरम्यान  लोहमार्गावर एक 45 वर्षीय अनोळखी व्यक्ती शुक्रवारी मृत स्थितीत आढळून आला. मृतावस्थेतील व्यक्तीचे मेंदू आणि चेहरा रेल्वे खाली चेंदामेंदा झाल्यामुळे पोलीसांना मृतांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. सदरील व्यक्तीने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच फूट पाच इंच उंची सावळा रंग अंगात पांढरा शर्ट , फिक्कट हिरव्या रंगाची पँन्ट असा अंगात पेहराव आहे.या अनोळखी व्यक्ती संदर्भात कोणाला अधिक माहिती मिळाल्यास वैजापूर पोलिसांनी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे यांनी केले आहे. दरम्यान मृत व्यक्ती वैजापूर शहरात फुलेवाडी परिसरातील रिक्षा चालक असल्याची चर्चा होत आहे.