भारताने अजून एक शिखर गाठले : रोगमुक्तांचा एकूण आकडा 24 लाखांच्या पार

गेल्या 24 तासात 66,550 रुग्णांची कोविडवर मात
“टेस्ट, ट्रॅक, ट्रीट” धोरणाचा अवलंब, भारतात जवळपास 3.7 कोटी चाचण्या

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2020:केंद्र सरकार आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी राबवलेल्या सामुहिक आणि धोरणात्मक उपाययोजनांचे योग्य परिणाम दिसून येत आहेत.

दिवसभरातील कोविड रोगमुक्तीचा नवा उच्चांक आज भारताने नोंदवला आहे. 66,550 कोविडबाधित गेल्या 24 तासांमध्ये रोगमुक्त होऊन रुग्णालयातून बाहेर पडले आहेत. अग्रक्रमाने चाचण्या, सर्वंकष ट्रॅकिंग आणि परिणामकारक औषधोपचार यामुळे रोगमुक्तांचा एकूण आकडा 24 लाखांना पार करून गेला आहे (24,04,585)

याबरोबरच भारतात कोविड-19 रुग्णांचे रोगमुक्त होण्याचे प्रमाण 76% (75.92%) वर पोचले आहे. आजारातून बरे झालेल्यांची संख्या बाधितांपेक्षा(7,04,348) लक्षणीयरित्या म्हणजे 17 लाखांहून जास्त आहे. आजच्या दिवशी रोगमुक्तांचे प्रमाण उपचाराधिन रुग्णांच्या 3.41 पट आहे.

गेल्या 25 दिवसांमध्ये रोगमुक्तांच्या प्रमाणात 100%अशी लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

रोगमुक्तांची ही विक्रमी संख्या देशातील वास्तविक रुग्णांची संख्या कमी झाल्याची  खात्री दर्शवते. म्हणजेच आता बाधित असलेल्यांची एकूण संख्या कमी होऊन एकूण बाधित झालेल्यांच्या रुग्णसंख्येच्या 22.24%एवढीच आहे. 

केंद्र सरकार आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनीएकत्रितपणे  वैद्यकीय चाचण्यांमधून आजाराची निश्चिती, देखरेख आणि संसर्ग-संपर्काचा माग काढणे याशिवाय गृह वा संस्था विलगीकरण, यासोबतच सुधारित वैद्यकिय पायाभूत सुविधांमुळे  वेळच्यावेळी सुधारित उपचार    अश्या उद्दिष्टकेंद्री व परिणामकारक उपाययोजना कोविडसाठी राबवल्या.   यामध्ये समर्पित कोविड केअर संस्था,  समर्पित कोविड आरोग्य संस्था आणि समर्पित कोविड रुग्णालये यांचा समावेश आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी अपेक्षित परिणाम दाखवले.  सातत्याने घटत असलेला मृत्यूदर आज  1.84% होता.

प्रति दशलक्ष चाचण्यांचे (टीपीएम) प्रमाण वाढत असून ते 26,685 पर्यंत पोहोचले

“टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट” यावर लक्ष केंद्रित करून भारताने आतापर्यंत सुमारे 7.7 कोटी संचयी कोविड-19 नमुन्यांची चाचणी केली आहे. दररोज चाचण्यांची संख्या वेगाने वाढविण्याच्या भारताच्या संकल्पानुसार आतापर्यंतची संचयी चाचणी 3,68,27,520 वर पोहोचली आहे.

प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण वाढत जाऊन थेट 26,685 पर्यंत पोहोचले असून, गेल्या 24 तासात 9,25,520 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

वेळेवर रुग्णांची ओळख, त्वरित विलगीकरण आणि प्रभावी उपचार या दिशेने पहिले पाऊल टाकत, मोठ्या प्रमाणावरील चाचणी प्रक्रियेमुळे संक्रमणाचा प्रसार मर्यादित राहिला आहे.

पुण्यात पहिली चाचणी प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर, भारतातील चाचणी प्रयोग शाळांचे जाळे सातत्याने विस्तारत राहिले आहे, सध्या 1524 प्रयोगशाळा आहेत. 986 प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि 538 प्रयोगशाळा खासगी क्षेत्रात आहेत. यामध्ये समाविष्ट होणाऱ्यांमध्ये :

  • रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 787 :  (शासकीय : 459 + खासगी :  328)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 619 (शासकीय :  493 + खासगी : 126)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 118 : (शासकीय :  34 + खासगी 84)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *