श्रीक्षेत्र सराला बेट येथे सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 120 व्या पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्याकडून पाहणी

वैजापूर,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :-श्रीक्षेत्र सराला बेट येथे योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज यांची 120 वी पुण्यतिथी व मंदिर जिर्णोद्धारपूर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा निमित्ताने श्री हरहर महायज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त 16 ते 23 डिसेंबर 2022 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोहळा निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते पार पडला. खा.सदाशिवराव लोखंडे, आ.रमेश बोरणारे, आ. लहू कानडे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाची सध्या पूर्वतयारी सुरू आहे.वैजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जेष्ट कार्यकर्ते साबेर खान यांनी गुरुवारी ( ता.15) श्री क्षेत्र सराला बेट येथे जाऊन पूर्वतयारी कामाची पाहणी केली. मठाचे विश्वस्त मधुकर महाराज, शिवसेना ठाकरे गटाचे खंडू पाटील गाढे, अशोक चांदकर, धनंजय जाधव, विजय साळुंके आदी यावेळी उपस्थित होते,