महात्मा फुले योजनेबाबत सुधारणा अपेक्षित – सर्व लोकप्रतिनिधींची मागणी 

 औरंगाबाद, दि.24 :- सर्व लोकप्रतिनिधीनी महात्मा फुले योजनेबाबत सुधारणा अपेक्षीत असून या योजनेचा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देखील संबंधीत विभागाला दिल्या . त्या योजनेमुळे सर्वसामान्य रुग्णांचा आर्थिक ताण, मानसिक ताण कमी होवून रुग्ण बरा होण्याचा अवधीही कमी होईल.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. या प्रसाराच्या अटकावा करिता जिल्ह्यात 13 बाजारांच्या गावात तत्काळ कोरोना चाचणी करण्यात येणार असून, या चाचणीमुळे निश्चितच कोरोना विषाणुच्या प्रसारास आळा बसेल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी लोकप्रतिनिधी समवेत कोरोना आढावा बैठक घेण्यात येते यावेळी ते बोलत होते. बैठकीला खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महानगरपालिकेचे उपायुक्त रविंद्र निकम, मनपाच्या आरोग्य अधिकारी डाँ. निता पाडळकर आदीची उपस्थिती होती.

Image may contain: one or more people, people sitting, table and indoor

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात मोठया प्रमाणात पसरत असून जिल्हृयातील 13 बाजार भरणाऱ्या गावात कोरोना तपासणी केल्याने कोरोना विषाणुच्या प्रसारास प्रतिबंध होईल असा विश्वास व्यक्त करुन श्री. चव्हाण म्हणाले की शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना रोख स्वरुपातील दंडासह मास्क देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 6 हजार 302, तर शहरात 13 हजार 847 रुग्ण आहे. तर जिल्ह्यात एकुण 21 हजार 149 कोरोना बाधित रुग्ण आहेत तर 74.03% रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ‘कोरोना योध्दा’ व त्याच्या परिवारास तत्काळ मदत मिळण्याकरिता ‘प्रतिसाद कक्षाची’ स्थापना करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. भागवत कराड यांनी खाजगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर घाटी रुग्णालयासाठी उपलब्ध करुन देणे तसेच कोरोना रुग्णांच्या तपासणीची संख्या वाढण्याचीही मागणी केली. लक्षणे असेल तरच चाचणी न करता सर्वांची चाचणी करण्यावर भर द्यावा अशा सूचना देखिल सबंधीतांना दिल्या, तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पोलीस विभागानी लक्ष देण्याची गरज असून तपासणी संख्या वाढवल्यास ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल असेही ते यावेळी म्हणाले . खा. इम्तियाज जलील यांनी राज्यात ज्याप्रमाणे बस सेवा सुरु करण्यात आली याच धर्तीवर, ऑटो रिक्षा, चालू करण्याची मागणी केली. तर आमदार अंबादास दानवे, आ. अतुल सावे, प्रदीप जैस्वाल यांनी नागरिक हर्सुल तलाव, हिमायत बाग येथे पर्यटनासाठी गर्दी करत असून मनपाकडून दंडात्मक कारवाईचे फलक लावण्याच्या सूचना एकमताने केली. आमदार अंबादास दानवे यांनी वैद्यकीय कचऱ्यांची विल्हेवाट योग्य पध्दतीने करुन, वापरात येणारे मास्क आणि हॅण्डग्लोज पुर्नवापर होऊ नये याकरिता कडक तपासणीच्या सूचना केल्या तर काही ठिकाणी कोविड केअर सेंटर मध्ये अधिक सुविधा पुरवण्याच्याही सूचना केल्या तर आ. जैस्वाल यांनी खाजगी डॉक्टर रुग्णांना तत्काळ सेवा देण्यास कमी पडत असल्याचे सांगितले.
याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधीनी महात्मा फुले योजनेबाबत सुधारणा अपेक्षीत असून या योजनेचा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देखील संबंधीत विभागाला दिल्या . त्या योजनेमुळे सर्वसामान्य रुग्णांचा आर्थिक ताण, मानसिक ताण कमी होवून रुग्ण बरा होण्याचा अवधीही कमी होईल.
यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रशासनाने केलेल्या उपाय योजनाबाबत प्रझेंटेशनव्दारेअप्पर जिल्हाधिकारी डाँ अनंत गव्हाणे यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *