‘आता मुक्यांची भाषा शिकावी लागेल, पण त्यातही…’, वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची सारवासारव

शाळांसाठी आंबेडकर-फुलेंनी भीक मागितली, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद

औरंगाबाद,९ डिसेंबर / प्रतिनिधी :-राज्यात वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. आता भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून सारवासारव केल्याचं पहायला मिळत आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वातावरण तापलंय.’ मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’, अशा घोषणा दिल्या गेल्या आहेत. पाटील यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रौद्र रुप धारण केलं. पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. 

पाटील काय म्हणाले?  

‘शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता?  ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावरून वाद निर्माण होताच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘त्या काळात आपण माधुकरी मागून शिकलो, माधुकरी म्हणजे काय तर भिक मागणे. भाऊराव पाटील धान्य गोळा करायचे हे तुम्हाला माहित आहे का? भीक मागून मी माझी संस्था वाढवली हा प्रचलीत शद्ब आहे. यात मी काय चुकीचं बोललो? उलट मी त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठीच बोललो, मात्र विरोधक ध चं मा करतात. आता मला मुक्याची भाषा शिकावी लागेल, पण त्यातही अडचणी आहेत. कारण विरोधकांकडे दुसरं कामच उरलं नाही’  असं  चंद्रकांत पाटील यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला देखील टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले असून, आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे राजकारण सुरू आहे, सत्ता गेली त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचे हे कारस्थान असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

“भाजपमधील आणखी एका वाचाळविराने मुक्ताफळे उधळली.कर्मवीर भाऊराव पाटील, म.फुले , बाबासाहेबानी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करुन  महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व  महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या भिकारी चंद्रकांत पाटलाचा जाहीर निषेध”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांना आपला संताप व्यक्त केलाय. 

“दादांच्या विधानाचा जाहीर निषेध”

छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या सर्वच महापुरुषांचा अवमान कुणीही करु नये म्हणूनच काल मी संसदेत महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी करत होतो. जेणेकरून आपल्या अस्मितेला नख लावण्याचं धारिष्ट कोणी करणार नाही”, असं खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट केलंय.