5 जी सेवांमध्ये उद्‌भवणाऱ्या समस्या

नवी दिल्ली,९ डिसेंबर /प्रतिनिधी :-टीएसपीज अर्थात दूरसंचार सेवा पुरवठादारांनी 1 ऑक्टोबर 2022 पासून देशभरातील ग्राहकांना  5 जी सेवा पुरवायला सुरुवात केली असून 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत देशातील एकूण 14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 50 शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासंदर्भात, स्पेक्ट्रमचा लिलाव तसेच परवानाविषयक नियमांसाठी विहित असलेल्या अर्ज आमंत्रण नोटीसनुसार, स्पेक्ट्रमचे वितरण झाल्यापासून पाच वर्षांच्या काळात टप्प्याटप्प्याने किमान नियम आणि अटींची पूर्तता होणे अनिवार्य आहे.

म्हणून 5 जी सह सर्व दूरसंचार नेटवर्कचे कार्य वेगवान आणि सुलभ पद्धतीने सुरु राहण्याकरिता तसेच देशभरात दूरसंचारविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याकरिता, केंद्र सरकारने खालील धोरणात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत:-

  • लिलावाच्या माध्यमातून मोबाईल सेवांसाठी पुरेशा प्रमाणात स्पेक्ट्रम उपलब्ध करून देणे
  • स्पेक्ट्रमची भागीदारी आणि देवाणघेवाण यांना परवानगी देणे
  • स्पेक्ट्रमचा भागीदारीत वापर करताना लागणारा 0.5% दराने लागणारे अतिरिक्त स्पेक्ट्रम वापर शुल्क रद्द. 
  • विविध टीएसपी कंपन्यांना पायाभूत सुविधांचा सामायिक वापर करण्यास परवानगी देणे
  • जमिनीखालील आणि जमिनीच्या वर निर्माण कलेल्या पायाभूत सुविधांचे नियमन करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2016 रोजी जारी केलेला भारतीय टेलिग्राफ राईट ऑफ वे नियम, 2016 आणि त्यातील सुधारणा (भारतीय टेलिग्राफ राईट ऑफ वे सुधारित नियम, 2022) अधिसूचित करणे.

राज्यसभेत आज विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी सभागृह सदस्यांना ही माहिती दिली.