काँग्रेस आमदार ठाकरे सरकारवर नाराज ; सोनिया गांधींकडे तक्रार करणार

जालना : महाविकास आघाडीतील पक्षांतर्गत नाराजी नाट्य सुरूच असून निधीवाटपावरून काँग्रेसचे ११ आमदार उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला आहे. या आमदारांनी सरकारच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पराभूत नेते सोबत घेऊन फिरतात काॅग्रेसच्या आमदारांना सापत्नकेची वागणूक देत आहेत राज्यातील काॅगेसच्या अकरा आमदारांनी एकत्रितपणे शिंदे यांच्या विरोधात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे तक्रार केली असल्याचे आ.कैलास गोरंट्याल यांनी शुक्रवारी जालन्यात सांगितले.  

शिवसेनेच्या पराभूत नेत्यांना शिंदे जवळ करतात सेनेच्याच  पदाधिकार्यांना त्यांच्या शिफारशी नुसार निधी देतात काॅगेसच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेच्या विकास कामासाठी शिंदे अडवणूक करतात असा थेट आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. जालना जिल्ह्यातील जालना, अंबड,परतूर व भोकरदन या   चार नगर पालिकांच्या विविध विकास योजना साठी दिनांक 27 मार्च रोजी 29 कोटी रुपये निधी राज्य सरकारने पाठवला होता तर बदनापूर ,मंठा,घनसावंगी आणि जाफ्राबाद या नगर पंचायत मधील विविध विकास योजना साठी 7 कोटी रुपये निधी राज्य सरकारने पाठवला होता. अचानक दिनांक 29 मार्च रोजी हा एकूण 36 कोटी रुपये निधी नगर विकास खात्याने रात्रीतून गायब केला हा पैसा कोठे गेलाय याचा अद्याप थांगपत्ता लागत नाही आपण गेल्या पाच महिने झाले ते शोधत आहोत या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तसेच काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आम्ही तक्रार केली असल्याची माहिती गोरंट्याल यांनी दिली.

 आपण काँग्रेसचे आमदार आहोत जालना, भोकरदन व परतूर नगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात आहेत त्यामुळे शिवसेनेचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पक्षीय राजकीय पार्श्वभूमीवर विचार करून वागणे अत्यंत खेदजनक आहे आगाडी धर्माच्या विरोधात आहे याची  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कल्पना देण्यात आली आहे असे ते म्हणाले. जालना जिल्ह्याचा हा 36 कोटी रुपयांचा निधी नगर विकास खात्याने याच पध्दतीने  परत घेतला आहे त्यामुळे जिल्ह्यातील विशेष म्हणजे नागरी भागातील अनेक  विकास योजना खोळंबून पडल्या आहेत पालकमंत्री राजेश टोपे यांना या सगळ्या संदर्भात माहिती आहे आता त्यांना एकदा घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी सगळे जाणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. ….  
जालना शहरातील पाणी,लाईट आणि स्वच्छतेचा प्रश्न जालना नगर पालिकेने मार्गी लावला आहे.  रस्त्यांच्या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या  तक्रारी आहेत.राज्य शासनाच्या नगर विकास खात्याचे म॔त्री एकनाथ शिंदे  यांच्या कडून  अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने हा प्रश्न मागे पडला आहे असे गोरंटयाल म्हणाले.   
केंद्रीय राज्यमंत्री  रावसाहेब  दानवे व पालकमंत्री  राजेश टोपे यांचे सहकार्य आपल्याला  सहकार्य मिळते  शहरातील जनतेच्या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित म्हणून हा स्वच्छता पुरस्कार मिळाला  श्रेय हे या सर्व मंडळींना आहे. शरद पवारांनी जालना शहरातील स्वच्छते संदर्भात एकदा मोठी टीका केली होती. त्यावेळीच जालना शहरातील स्वच्छतेच्या कामाबद्दल आपण खुणगाठ बांधून त्या दिशेने कामकाज करण्यासाठी  सुरुवात केली  पालिकेतर्फे आवश्यक ते नियोजन केले. शहरातील प्रत्येक भागात आम्ही हे अभियान शंभर टक्के पूर्ण यशस्वीपणे राबविले असा दावा आपण करणार नाही, मात्र स्वच्छ भारत सर्वेक्षणाचे काम शहरात 75 टक्के यापेक्षा अधिक प्रभावीपणे राबविले असे गोरंटयाल म्हणाले. 

स्वच्छतेचा हा टेम्पो पुढे कायम राखण्यासाठी जालना नगर पालिकेतर्फे आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.आगामी कालावधीत खाजगी दवाखाने, हॉटेल,मंगल कार्यालय, पानटपऱ्या आदी व्यावसायिक ठिकाणी होणाऱ्या कचऱ्यासंदर्भात लक्ष केंद्रित करून जालना शहर स्वच्छ व सुंदर कसे करता येईल याबाबत नियोजन करण्यात येणार असून सध्या कचरा जमा करण्यासाठी सुरू असलेल्या घंटा गाड्यांव्यतिरिक्त व्यावसायिक ठिकाणचा कचरा गोळा करण्यासाठी अतिरिक्त घंटा गाड्या आणि मोबाईल व्हॅनची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आ.गोरंटयाल यांनी सांगितले. शहरातील ज्या प्रभागातील छोट्या=छोट्या बोळीत घंटा गाड्या जात नाहीत अशा ठिकाणचा कचरा गोळा करण्यासाठी नगरसेवकांनी ई रिक्षाचा वापर करण्यासाठी प्रयत्न आहेत असे ते म्हणाले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यावेळी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *