संशोधनात सहभागी असणाऱ्या सर्वांसाठी वास्तुपाठ, आपल्या मार्गातील अनपेक्षित उत्सुकतेसाठी थोडा वेळ काढा- नोबेल विजेते प्रो. डंकन हलडेन

मुंबई, 23 ऑगस्ट 2020

आयआयटी बॉम्बेचा 58 वा दीक्षांत सोहळा सध्याच्या संक्रमण परिस्थितीमुळे आज व्हर्चुअल रिअॅलिटी पद्धतीने पार पडला. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे तसेच त्यांना देशातील प्रमुख अभियांत्रिकी संस्थेच्या पदवीचे यश आणि अभिमानापासून वंचित ठेवू नये, यासाठी संस्थेने अशा प्रकारच्या आभासी दीक्षांत सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रत्येक पदवीधारकाला संचालक प्रो. सुभाशीष चौधरी यांच्या हस्ते वैयक्तिरीत्या पदवी प्रमाणपत्र मिळाल्याचा डिजीटल अवतार होता. पदकविजेत्यांनाही त्यांचे पदक मुख्य अतिथींच्या हस्ते मिळाल्याची भावना होती. दीक्षांतसोहळ्याचे दूरदर्शन, डीडी सह्याद्री वाहिनीवर आणि युट्यूब आणि फेसबूकवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.

दीक्षांत सोहळा म्हणजे सहसा विद्यार्थ्यांना मित्र आणि प्राध्यापकांसमवेत एकत्र येण्याची शेवटची संधी असते. यावर्षी संस्थेने विद्यार्थ्यांना आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याची संधी दिली, व्हर्चुअल कॅम्पसमध्ये फिरण्याची, वसतीगृह आणि विभागांना भेट देण्याची, मित्र आणि शिक्षकांना भेटण्याची संधी प्रदान करुन दिली.  

प्रो.डंकन हलडेन, 2016 चे भौतिकशास्त्रासाठीचे संयुक्त नोबेल पारितोषक विजेते, प्रिन्स्ट विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत, ते या समारंभाचे मुख्य अतिथी होते. ब्लॅकस्टोनचे सह-संस्थापक आणि सीईओ, जागतिक दर्जाचे गुंतवणूकदार आणि समाजसेवी स्टीफन श्वार्टसमन सन्माननीय अतिथी होते.

2019-2020 वर्षासाठीचा संस्थेचा अहवाल सादर करताना प्रो. सुभाशीष चौधरी यांनी माहिती दिली की, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आयआयटी बॉम्बेकडे बहुतांश विद्यार्थांचा कल असतो. ते म्हणाले, “आयआयटी बॉम्बेचे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे उद्योग, संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य असे उच्च गुणवत्तेचे पदवीधर निर्माण करणे आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी संपादन केलेले कौशल्य, जोपासलेली कार्यसंस्कृती त्यांच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी उपयोगी ठरते. देशाच्या विकासात त्यांच्या योगदानाकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ते पुढे म्हणाले, “पदवीधारकांसाठी व्हर्चुअल रिअॅलिटी अनुभव प्रदान करण्यात उच्च नवसंशोधनासह सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हे केले. आशा आहे की यामुळे आपले पदवीधर तसेच देशातील अन्य अभियंते मोठा आणि नाविन्यपूर्ण विचार करतील”.

मुख्य अतिथी प्रो. हलडेन म्हणाले, संशोधनकर्त्या प्रत्येकासाठी एक वास्तुपाठ आहे. तुम्ही जरी एखाद्या विशिष्ट ध्येयाने प्रेरित संशोधनात गुंतला असाल तरी अनपेक्षित उत्सुकतेसाठी थोडा वेळ काढा. कारण, संकल्पना अशी आहे की, तुम्ही जर बुटाने दगडांवर लाथा मारत चालत असाल तर, त्याचवेळी कदाचित एखादा कच्चा हिरा शोधण्यात तुम्ही गफलत कराल, आणि दुसराच कोणीतरी त्या मार्गावरुन वाटचाल करेल आणि तुम्ही शोधलेला पण तुमच्या लक्षात न आलेला हिरा त्याला दिसेल”.

आपल्या भाषणात स्टीफन श्वार्टसमन म्हणाले, “भारताचे सध्या जगात विशिष्ट स्थान आहे, विशेषतः तंत्रज्ञानाच्या बाबतीत, भारताने प्रतिभेच्या माध्यमातून जागतिक आघाडी घेतली आहे. जगातील 72 भारतीय वंशाच्या अभियंत्यानी युनिकॉर्नसची स्थापना केली आहे, यापैकी अर्धे आयआयटीचे विद्यार्थी आहेत. आयआयटी अभियंते जागतिक तंत्रज्ञानाची जागा व्यापत आहेत आणि नवीन विद्यार्थी हे मोहिमेला पुढे घेऊन जाणारे भविष्यातील नेतृत्व आहेत”.  

Image

ते पुढे म्हणाले तरुण, महत्वाकांक्षी आणि तंत्रज्ञानाची माहिती असलेली लोकसंख्या, उद्योजकतेला पाठिंबा देणारे पुरोगामी विचारांचे सरकार, जगातील चौथ्या क्रमांकाची स्टार्ट-अप परिसंस्था, यामुळे भारत नवोन्मेषातील महान केंद्र ठरु शकतो.

यावर्षीच्या पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये 381 पी एचडी, 18 द्वी पदवीधारक (एम टेक/ एम फिल + पी एचडी) आणि 27 द्वी पदवीधारक (एम एससी+पी एचडी) आहेत. यापैकी, 39 संशोधकांना 2018-20 चा ‘एक्सलन्स इन पी एचडी रिसर्च’ सन्मान मिळाला आहे. याव्यतिरिक्त, मोनाश विद्यापीठाच्या सहकार्याने 33 संयुक्त पी एचडीधारक, यांना मोनाश विद्यापीठाचे कुलगुरु आणि अध्यक्ष प्रो. मार्गारेट गार्डनर यांच्या हस्ते पी एचडी प्रदान करण्यात आली.

यावर्षी, एक पी एचडी अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठ, सेंट लुईस यांच्या संयुक्त निरीक्षणाखाली, आणि दोन पी एचडी, [एम टेक+पी एचडी आणि एम एससी+पी एचडी] वुलोनगॉग विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या युनिव्हर्सिटी दी क्युबेक अ त्रोईस रिव्हीरीज यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आल्या.

या व्यतिरिक्त, 11 एमएस (संशोधन), 6 द्वी पदवी (एम एससी+एम टेक), 621 एम टेक, 64 एमडीईएस, 20 एम फिल, 110 एमएमजिटी, 225 दोन वर्षाचे एम एससी, 2 पाच वर्षाचे एम एससी, 342 द्वी पदवी (बी टेक + एम टेक), 684 बी टेक पदव्या, 10 आंतरशाखीय द्वी पदव्या (बी टेक/ बी एस+एम टेक/एम एससी), 20 द्वी पदवी (बीडीईएस+एमडीईएस), 6 द्वी पदवी (बीएस+एम एससी), 16 बीएस, 15 बीडीईएस, आणि 16 पीजीडीआयआयटी, दीक्षांतसोहळ्यात प्रदान करण्यात आल्या.

यावर्षी, तीन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. साहिल हिराल शाह (बी. टेक.) यांना ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ पदक. संस्थेचे ‘इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल (2018-19)’ शाश्वत शुक्ला, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी, तर ‘डॉ शंकर दयाल शर्मा गोल्ड मेडल’ प्रकाश सिंग बादल, सिव्हील अभियांत्रिकी यांना प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त, विभागातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रजत पदके प्रदान करण्यात आली.

प्रो. मार्गारेट गार्डनर, अध्यक्ष आणि कुलगुरु, मोनाश विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया, बोर्ड ऑफ गव्हर्नर सदस्य आणि देशातील तसेच परदेशातील अनेक नामवंत अतिथी, पदवीधारक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती होती.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *