श्रीक्षेत्र सराला बेट येथे होणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमासंदर्भात बैठक

वैजापूर, ६ डिसेंबर / प्रतिनिधी :-श्रीक्षेत्र सराला बेट येथे होणाऱ्या सदगुरू योगिराज  श्री.गंगागिरीजी महाराज यांची 120 वी पुण्यतिथी व मंदिर जिर्णोध्दार पूर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा  निमित्ताने श्री.हरिहर महायज्ञ अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयासंदर्भात वैजापूर येथे बैठक झाली.

पंचायत समितीच्या स्व. विनायकराव पाटील सभागृहात श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती हभप रामगिरीजी महाराज, आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.   

हभप रामगिरीजी महाराज यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी 101 पोती साखर देण्याचे आ. रमेश पाटील बोरणारे यांनी यावेळी जाहीर केले. बैठकीस वैजापूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, व्यापारी संघटनेचे प्रकाश बोथरा, काशीनाथ गायकवाड, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण, शोभाचंद संचेती यांच्यासह पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.