जीवनात परमेश्वराची प्राप्ती हेच मुख्य कार्य:स्वर्वेद पंचम मण्डल चतुर्थ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

प्रथम सत्य संकल्प दृढ़, मैं निश्चय कर काज ।

त्रिविध ताप से छूट कर, मिलों महाप्रभु काज ।।३९।।

(स्वर्वेद पंचम मण्डल चतुर्थ अध्याय) ०५/०४/३९

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

प्रथम सत्यसंकल्प दृढ असला पाहिजे की मी हे कार्य अवश्य पूर्ण करीन, मग ते कार्य पुरुषार्थ केल्यावर सफल होते. अशाच प्रकारे योगाच्या पुरुषार्थाद्वारे याच जीवनात त्रिविध तापां पासून सुटून महाप्रभूची प्राप्ती करीन, असा दृढ, सत्यसंकल्प निश्चय असला पाहिजे. जीवनात परमेश्वराची प्राप्ती हेच मुख्य कार्य  आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www vihangamyoga.org