श्रीक्षेत्र सराला बेट येथे सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 102 व्या पुण्यतिथी व श्री हरहर महायज्ञ सोहळ्यानिमित्त ध्वजारोहण

वैजापूर, ४ डिसेंबर / प्रतिनिधी :-श्रीक्षेत्र सराला बेट येथे योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज यांची 102 वी पुण्यतिथी, मंदिर जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच श्रीहरहर महायज्ञ सोहळा निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम रविवारी (ता.04) सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज व महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते पार पडला.

या प्रसंगी खासदार सदाशिवराव लोखंडे, आ.रमेश पाटील बोरणारे, आ.लहू कानडे, माजी नगराध्यक्ष साबेर खान,भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी,माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे,बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.