वैजापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

वैजापूर, ३ डिसेंबर  / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य या पदासाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे त्यासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी 1,2,3 यांना शनिवारी (ता.03) वैजापूर पंचायत समिती सभागृहात तहसीलदार राहुल गायकवाड व नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणप्रमुख धोंडिरामसिंह राजपूत यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना पार पाडव्याच्या कर्तव्याविषयी प्रशिक्षण दिले. कर्तव्ये, जबाबदाऱ्या, ई.व्ही.एम. हाताळणी याबाबत त्यांनी माहिती दिली. या निवडणुकीसाठी 25 ग्रामपंचायत क्षेत्रातील 77 प्रभागातील 225 जागांसाठी  निवडणूक होणार असून सरपंच थेट मतदारातून निवडण्यात येणार आहे. तहसीलदार राहुल गायकवाड यांनी व शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर यांनीही नियुक्त अधिकारी वर्गाला मार्गदर्शन केले. याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर, प्रशिक्षण विभागाचे एस. आर. दुशिंग, श्री. वाघ, संतोष जाधव, श्री. पुंड, सचिन गायकवाड, नितीन गवळी यांनी सहभाग नोंदविला.