कोरोना चे संकट दूर होऊ दे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे गणरायाला साकडे

बीड -जिल्हयाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे आपल्या निवासस्थानी ‘”श्री'”ची स्थापना केली.यावेळी श्रीगणेश स्थापनेची विधिवत पूजा करून आरती केली. राज्याला कोरोनाच्या संकटातून मुक्त करा असे साकडे बाप्पाला घातले आहे.

Image

नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात श्रींची विधिवत स्थापना केली. कोविड विषयक सर्व खबरदारी घेत साधेपणाने हा गणेशोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. गणेशाचे आगमन आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद व समृद्धी घेऊन येवो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *