लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार यांनी दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ पदाचा स्वीकारला कार्यभार

पुणे,१ डिसेंबर   /प्रतिनिधी :-पुणे येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे, देशाप्रती आपल्या कर्तव्याचे पालन करताना हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण करून  लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार यांनी  पुणेस्थित दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ या पदाचा कार्यभार 01 डिसेंबर 2022 रोजी स्वीकारला.  लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार हे कपूरथळा  येथील सैनिकी शाळा आणि खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत.

14 जून 1986 रोजी कोअर ऑफ सिग्नल्समधून ते लष्करी सेवेत दाखल झाले. त्यांनी विविध भूप्रदेश आणि भूतानमधील भारतीय लष्करी प्रशिक्षण दलामध्ये सिग्नल कंपनी कमांड जबाबदारी पार पाडली असून नियंत्रण रेषेवर तैनात घुसखोरी विरोधातील मोहीम/दहशतवादविरोधी मोहिमेवर तैनात इन्फंट्री डिव्हिजन सिग्नल रेजिमेंट अशा मोहिमांवर काम केले आहे. त्यांनी महू येथील दूरसंवाद अभियांत्रिकी लष्करी महाविद्यालय आणि चेन्नई येथील ऑफिसर्स प्रशिक्षण अकादमी, येथे  प्रशिक्षक म्हणून कार्य केले आहे.

जनरल ऑफिसर यांनी   सर्व महत्त्वाच्या करिअर अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे, त्यामध्ये  म्हणजे ऑपरेशन  पराक्रम दरम्यान हल्ला करण्यासाठी विशेष तुकडी असलेल्या स्ट्राइक कोअरच्या मुख्यालयात जनरल स्टाफ ऑफिसर, श्रेणी – 1(ऑपरेशन्स) , काउंटर इनसर्जेंसी फोर्स (राष्ट्रीय रायफल्स) च्या मुख्यालयात कर्नल प्रशासन, माहिती प्रणाली महासंचालनालयात कर्नल जनरल स्टाफ, सिग्नल संचालनालयातील उपमहासंचालक सिग्नल कर्मचारी, स्ट्राइक कोअरचे मुख्य सिग्नल अधिकारी, उत्तरी कमांड मध्ये मुख्य सिग्नल अधिकारी आणि लष्कराच्या मुख्यालयातील माहिती प्रणाली महासंचालक यांचा समावेश आहे.

मावळते चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी कमांडच्या सर्व श्रेणीतील अधिकारी आणि जवानांचे त्यांच्या अतुलनीय बांधिलकी, समर्पण आणि निष्ठेबद्दल  आणि अत्यंत आव्हानात्मक वातावरणात नेमून दिलेली कामे पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले.