सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

ANNAPOORNA MITHAI, Madurai - Restaurant Reviews, Photos & Phone ...

बीड, दि. २२ ::– जिल्ह्यातील बीड, माजलगांव, परळी, अंबाजोगाई , केज व आष्टी या शहरांमधील सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना 23 आॅगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण कुमार धरमकर यांनी दिले आहेत.

तसेच सर्वांनी कोवीड-19 विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे. तसेच कन्टेनमेंट झोन मधील परिसरातील निर्बध तसेच कायम राहतील.यापूर्वी बीड, माजलगांव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरांमध्ये २१ आॅगस्ट २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आले होते. सुशोभिकरणाचे साहीत्य विक्री करणारे दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, व इतर सर्व प्रकारच्या सर्व दुकानांना उघडण्याच्या परवानगीबाबत लाॅकडाऊन नंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल असे नमूद केले असल्याने हे स्वतंत्र आदेश दिले आहेत.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3 व4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाची स्थापना करण्यात आलेलीआहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी हे उक्तप्रधिकरणाचे अध्यक्ष आहेत.बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144(1)(3) अन्वये दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजीचे रात्री 12.00 वा.पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *