वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन

वैजापूर, १ डिसेंबर  / प्रतिनिधी :-शेतकऱ्यांना वीज बिल सक्ती व पीकविमा कंपनी धोरणाविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता.01) वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला रस्त्यावर शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारच्या शेतकरी  विरोधातील धोरणाविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर चक्का जाम करत घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त केला. शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताच पोलिसांनी कारवाई करत चंद्रकांत खैरे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या आंदोलनात पक्षाचे सहसंपर्कप्रमुख आसाराम रोठे, महिला आघाडीच्या आनंदीबाई अन्नदाते, उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख तथा नगरसेवक सचिन(बंडू) वाणी, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक लता पगारे, तालुका संघटक वर्षाताई जाधव, भारती कवाडे, सुरेखा छानवाल, तालुका युवाधिकारी विठ्ठल पाटील डमाळे, तालुका संघटक मनोज गायके, उपतालुकप्रमुख बबनराव जाधव, उपतालुकप्रमुख भाऊसाहेब पाटील गलांडे, रमेश पाटील सावंत, सजनराव शिंदे, भिकन सोमासे, नंदकिशोर जाधव, जितेंद्र जगदाळे,  बाळासाहेब बडक, अरूण शेलार, दीपक मतसागर, अक्षय साठे, बाळासाहेब जानराव, भगवान बेलकर यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.