मराठवाड्यात अर्जुन पुरस्काराचे दोन मानकरी ,कुस्तीपटू राहुल आवारे ,खोखोपटू सारिका काळे यांचा सन्मान 

रोहित शर्मा, मरियप्पन टी., मनिका बत्रा, विनेश आणि राणी यांना `खेल रत्न`

Image
बीडचा राहुल आवारे म्हणतो, बालपणापासून कुस्ती हेच ध्येय आहे. अर्जुन पुरस्कार मिळाला याचा आनंद तर आहेच, पण ज्यांनी मला घडवलं त्या साऱ्यांना याचे श्रेय जाते. आता ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचे बाकी आहे. ते मिळवेलच.

मीराबाई, साक्षी पुरस्काराला मुकल्या
 नवी दिल्ली :केंद्र सरकारकडून दिले जाणार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून, यंदा भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाच रोहित शर्मा यांच्या सह पाच खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय जवळपास ४० खेळाडू यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारचे मानकरी ठरेल आहे. सर्वांचे लक्ष लागूण असणाèया कुस्तीपटू साक्षी मलिक आणि भारोतोलनपटू मीराबाई चानू यांचा या यादीत समावेश नाही.

Sarika Kale Kho -kho

अर्जुन पुरस्कार विजेत्यात मराठवाड्यातील कुस्तीपटू राहुल आवारे ,खोखोपटू सारिका काळे यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षानंतर खोखोच्या खेळाडूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . सारिका उस्मानाबादची असून तुळजापूरला क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे . राहुल आवारे हा बीडचा असून सध्या तो डीवायएसपी म्हणून कार्यरत आहे. कुस्तीपटू राहुलचे सासरे काका पवार यांनाही अर्जुन पुरस्कार मिळाला आहे .  

‘खेलरत्न’ पुरस्कार मिळवणार तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी सचिन तेंडूलकरला १९९८मध्ये, महेंद्रसिंग धोनीला २००७ तर विराट कोहलीला २०१८मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीच्या झालेल्या बैठकीत रोहित, विनेश फोगाटसह अन्य दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहितने ५ शतके आणि १ अर्ध्यशतक झळकावले होते.त्याच्या या कामगिरीवरून बीसीसीआयने त्याच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली होती.
 
भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो. मात्र, यंदा कोरोनाच्या महामारीमुळे विजेत्यांची घोषणा ही ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

Khelratna_1  H

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठता वाखाणण्यासाठी आणि गौरव करण्यासाठी प्रतिवर्षी क्रीडा पुरस्कार दिले जातात. चार वर्षे क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार देण्यात येत असतो; चार वर्षे सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला अर्जुन पुरस्कार दिला जातो; प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू तयार करणाऱ्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो; क्रीडा विकासासाठी आजीवन योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार व्यावसायिक संस्थाना (खासगी आणि सार्वजनिक क्षेत्र अशा दोन्ही) आणि क्रीडा प्रोत्साहन आणि विकासाच्या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली आहे अशांना दिला जातो. आंतर-विद्यापीठ स्पर्धेत एकूणच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (एमएकेए-MAKA) करंडक दिला जातो. क्रीडा पुरस्कारांखेरीज, मंत्रालय देशभरातील लोकांमधील साहसी क्रीडा प्रकारातील धैर्य वाखाणण्यासाठी टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार देत आहे.

या वर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी खूप मोठ्या संख्येने अर्ज आले, ज्यावर निवड समितीने विचार केला, ज्याच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती (निवृत्त) मुकुंदकम शर्मा (माजी न्यायाधीश भारतीय सर्वोच्च न्यायालय) आणि अन्य सदस्य ज्यात प्रख्यात खेळाडू, क्रीडा, पत्रकारिता आणि क्रीडा प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि छाननीनंतर शासनाने पुढील श्रेणीतील विविध खेळाडू, प्रशिक्षक आणि विविध संस्थांना पुरस्कार देण्याचे ठरविले आहे :

29 ऑगस्ट, 2020 रोजी हे पुरस्कार राष्ट्रपती भवनातून आयोजित करण्यात येणाऱ्या व्हर्च्युअल (आभासी) पद्धतीच्या कार्यक्रमात भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार्थींना प्रदान केले जातील.

  1. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
अनु.क्र.खेळाडूचे नावक्रीडा शाखा
1.श्री रोहित शर्माक्रिकेट
2.श्री मरियप्पन टी.पॅरा अथलेटिक्स
3.कु. मनिका बत्राटेबल टेनिस
4.कु. विनेशकुस्ती
5.कु. राणीहॉकी
  1. द्रोणाचार्य पुरस्कार
  2. आजीवन श्रेणी
अनु. क्र.प्रशिक्षकाचे नावक्रीडा शाखा
1.श्री धर्मेंद्र तिवारीधनुर्विद्या
2.श्री पुरुषोत्तम रायअथलेटिक्स
3.श्री शिव सिंगमुष्टियुद्ध
4.श्री रोमेश पठानियाहॉकी
5.श्री कृष्ण कुमार हूडाकबड्डी
6.श्री विजय भालचंद्र मुनीश्वरपॅरा पॉवरलिफ्टिंग
7.श्री नरेश कुमारटेनिस
8.श्री ओम प्रकाश दहियाकुस्ती
  1. नियमित श्रेणी
अनु. क्र.प्रशिक्षकाचे नावक्रीडा शाखा
1.श्री. ज्यूड फेलिक्स सेबस्टियनहॉकी
2.श्री योगेश मालवियमल्लखांब
3.श्री जसपाल राणानेमबाजी
4.श्री कुलदिप कुमार हंदूवुशू
5.श्री गौरव खन्नापॅरा बॅडमिंटन
  1. अर्जुन पुरस्कार
अनु. क्र.खेळाडूचे नाव (श्री)क्रीडा शाखा
1.श्री अतनू दासधनुर्विद्या
2.कु. द्युती चंदअथलेटिक्स
3.श्री सात्विक साईराज रंकीरेड्डीबॅडमिंटन
4.श्री चिराग चंद्रशेखर शेट्टीबॅडमिंटन
5.श्री विशेष भृगुवंशीबास्केटबॉल
6.सुबेदार मनीष कौशिकमुष्टियुद्ध
7.कु. लवलिना बोरगोहेनमुष्टियुद्ध
8.श्री इशांत शर्माक्रिकेट
9.कु. दीप्ती शर्माक्रिकेट
10.श्री सावंत अजय अनंतअश्वारोहण
11.श्री संदेश झिंगनफुटबॉल
12.कु. अदिती अशोकगोल्फ
13.श्री आकाशदिप सिंगहॉकी
14.कु. दीपिकाहॉकी
15.श्री दीपककबड्डी
16.कु काळे सारिका सुधाकरखो खो
17.श्री दत्तू बबन भोकनळरोईंग
18.कु. मनू भाकरनेमबाजी
19.श्री सौरभ चौधरीनेमबाजी
20.कु मधुरिका सुहास पाटकरटेबल टेनिस
21.श्री दिविज शरणटेनिस
22.श्री शिवा केशवनविंटर स्पोर्ट्स
23.कु. दिव्या काकरनकुस्ती
24.श्री राहुल आवारेकुस्ती
25.श्री सुयश नारायण जाधवपॅरा स्विमींग
26.श्री संदिपपॅरा अथलेटिक्स
27.श्री मनीष नारवालपॅरा शूटिंग
  1. ध्यानचंद पुरस्कार
अनु. क्र.खेळाडूचे नावक्रीडा शाखा
1.श्री कुलदिप सिंह भुल्लारअथलेटिक्स
2.कु जिन्सी फिलिप्सअथलेटिक्स
3.श्री प्रदीप श्रीकृष्ण गंधेबॅडमिंटन
4.कु. तृप्ती मुरगुंडेबॅडमिंटन
5.कु. एन. उषामुष्टियुद्ध
6.श्री लाखा सिंगमुष्टियुद्ध
7.श्री सुखविंदर सिंग संधूफुटबॉल
8.श्री अजित सिंगहॉकी
9.श्री मनप्रित सिंगकबड्डी
10.श्री जे. रनजीथ कुमारपॅरा अथलेटिक्स
11.श्री सक्यप्रकाश तिवारीपॅरा बॅडमिंटन
12.श्री मनजित सिंगरोईंग
13.कै. श्री सचिन नागपोहणे
14.श्री नंदन पी बालटेनिस
15.श्री नेत्रपाल हूडाकुस्ती
  1. टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2019
अनु. क्र.खेळाडूचे नावक्रीडा शाखा
1.कु. अनिता देवीलँड अडव्हेंचर
2.कर्नल. सरफराज सिंगलँड अडव्हेंचर
3.श्री टाका तामूतलँड अडव्हेंचर
4.श्री नरेंद्र सिंगलँड अडव्हेंचर
5.श्री केवल हिरेन कक्कालँड अडव्हेंचर
6.श्री सत्येंद्र सिंगवॉटर अडव्हेंचर
7.श्री गजानंद यादवएअर अडव्हेंचर
8.कै. श्री मगन बिस्साजीवनगौरव
  1. मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक
1.पंजाब विद्यापीठ, चंदीगड 
  1. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार
अनु. क्र.प्रकारराष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार 2020 साठी शिफारस केलेली संस्था
1.नवोदित आणि तरूण प्रतिभेची ओळख आणि संगोपनलक्ष्य इन्स्टिट्यूटआर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट
2.व्यावासायिक सामाजिक उत्तरदायित्वाद्वारे खेळांना प्रोत्साहनऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) लिमिटेड
3.खेळाडू आणि क्रीडा कल्याणकारी उपाययोजनाहवाई दल क्रीडा नियंत्रण मंडळ (एअर फोर्स स्पोर्ट्स कन्ट्रोल बोर्ड)
4.विकासासाठी क्रीडाआंतरराष्ट्रीय क्रीडा व्यवस्थापन संस्था (आयआयएसएम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *