संशयित नक्षलवादी आनंद तेलतुंबडेचा जामिन कायम!

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव प्रकरणात आनंद तेलतुंबडे यास जामिन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) याचिका शुक्रवारी फेटाळली.
उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांना खटल्यातील निर्णायक अंतिम निष्कर्ष मानले जाणार नाही, असे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळतांना स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस.गडकरी तसेच न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने तेलतुंबडे यांना जामिन देतांना दहशतवादी कारवायांसंबंधीचा कुठलाही पुरावा नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याने निरीक्षण नोंदवले होते.
तेलतुंबडे विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून त्यांनी बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय मार्क्सवादी विचारधारेला वाढवण्यासाठी आणि सरकारला पायउतार करण्याचा षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचिकाकर्ता विचारधारा, आंदोलन क्षेत्रातील एक बौद्धिक प्रमुख व्यक्ती आहे. ३० वर्षांपूर्वी सीपीआय (एम) करीता भूमिगत झालेला आरोपी मिलिंद तेलतुंबडे याचा जेष्ठ बंधु असल्याने त्यास याप्रकरणात फसवले जावू शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले होते.