गंगापूरात गुडघे व कंबरदुखी मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन

गंगापूर ,२५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान औरंगाबाद व श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर तालुक्यातील रुग्णांसाठी आयोजित गुडघे व कंबर दुखी मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य माजी आमदार लक्ष्मणराव मनाळ हे होते.

विश्वजीत चव्हाण, संतोष माने, इकबाल सिद्दिकी, खालिद नाहदी, रावसाहेब तोगे, ज्ञानेश्वर साबणे, विजय वरकड, प्राचार्या डॉ. सी एस पाटील उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.टी. पवार, वैशाली बागुल, विशाल साबणे यांची प्रमुख उपस्थिती होती. गंगापूर तालुक्यातील रुग्णांसाठी गुडघे व कंबर दुखी शिबिर दिनांक २४ ते २६ नोव्हेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती पाटील यांनी केले म.शि.प्र.मंडळाचे सरचिटणीस आ.सतीश चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे शिबिर घेण्यात आले.

दुःखाने  ग्रासलेले रुग्ण वेदना मुक्त होतील याची आशा नाही तर खात्री आहे असे प्रतिपादन केले उद्घाटक म्हणून बोलताना कैलास पाटील यांनी केले. भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान औरंगाबाद नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. आ सतीश चव्हाण यांनी हे शिबिर गंगापूर तालुक्यातील रुग्णांसाठी आयोजित केले. लक्ष्मणराव मनाळ यांनी आभार मानले. या शिबिरात तपासणी बरोबर कंबर व गुडघेदुखी यांचे एक्स-रे काढले जातील तरी शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

या शिबिरात मुंबई येथील सैफी हॉस्पिटलचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अभि चूनिया तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.नितेश बिरादार, डॉ.रोहन पवार, डॉ.आदिल सौदागर, डॉ.अंकित धोंगडे हे रुग्णांची तपासणी करत असून या शिबिरात पहिल्याच दिवशी 500 हून अधिक रुग्णांनी तपासणी करण्यात आली