चाळीस बँकांना लुटणाऱ्या ‘बंटी-बबली’ वर गुन्हा दाखल का होत नाही ?

औरंगाबाद, २० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- फसवणूक करत बँकांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या परमेश्वर नाझरकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. 

बँकिंग व्यवस्थेला खिळखिळ्या करणाऱ्या या गुन्हेगाराला लोकशाहीच्या विधिमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन व्यवस्थेतील भ्रष्ट लोकांनी पोसले आहे. लोकशाहीच्या तिन्ही स्तंभातील भ्रष्ट व्यक्तींमुळे समाजाला लागलेल्या या किडीला अभय मिळत आल्यामुळे अनेक लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. पण परमेश्वर सूर्यभान नाझरकर व त्याची पत्नी उज्वला परमेश्वर नाझरकर या दोन्ही ‘बंटी-बबली’ अट्टल गुन्हेगारास पोलीस विभागातील वरिष्ट अधिकाऱ्याचे अभय असल्यामुळे त्याच्या विरुद्ध पोलिस तक्रार करण्यास कोणीही धजावत नाही. हिंमत करून कोणी तक्रार केल्यास वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या दबावामुळे तक्रारदाराचाच छळ केला जातो. परिणामी ‘बंटी-बबली’ नाझरकर दाम्पत्य यांच्यावर योग्य कलमा अंतर्गत गुन्हे दाखल होऊन सबळ पुराव्यासह दोषारोप पत्र न्यायालयात दाखल होत नाही.

याचाच फायदा घेत या ‘बंटी-बबली’ने बनावट फर्म, बनावट कागद पत्रांआधारे चाळीस बँकांना लुटले.हे प्रकार असेच सुरू राहीले तर सामान्य माणसाचे काय होईल…?