पतीची दारू सोडण्यासाठी औषध देतो असे म्हणून महिलेला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार

वैजापूर तालुक्यातील मनूर येथील घटना

वैजापूर, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील मनुर येथे उघडकीस आली. या प्रकरणी एक वर्षानंतर बुधवारी पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुंजाराम कचरु दवंगे (वय 65) रा. मनुर असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.

पिडीत महिला ही सासेगाव (ता.कन्नड) येथील रहिवासी आहे. दवंगे याने तिला तुझ्या पतीला दारु सोडण्याचे औषध देतो म्हणून त्याच्या घरी बोलावून घेतले. ही महिला दवंगे याच्या घरी गेल्यानंतर त्याने तिला एका पडीक घरात नेले व तिथे अत्याचार केला. तसेच ही घटना कुणाला सांगितली तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. अशी तक्रार पिडीतेने केली आहे. जिवे मारण्याची धमकी दिल्याने तिने ही घटना कुणाला सांगीतली नाही अखेर तिने बुधवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.