जागतिक मुळव्याध दिनानिमित्त मोफत मूळव्याध, भगंदर, फिशर तपासणी आणि उपचार शिबीर 

औरंगाबाद, १​९​ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलीत आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे सोमवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी जागतिक मुळव्याध दिनानिमित्त सकाळी १० ते दुपारी ०१ या वेळेत  मूळव्याध, भगंदर, फिशर या सारख्या गुदविकारावरील आजारांसाठी मोफत तपासणी आणि उपचार शिबीर आयोजन केले आहे.        

मुळव्याध हा रूग्णाला बेजार करणारा एक आजार आहे. कारण याची लक्षणे सुरूवातीला जाणवत नाहीत. शिवाय अवघड जागेवर असलेल्या मुळव्याधीचे निदान आणि उपचार करण्यासाठी अनेकांना नेहमी संकोच वाटतो. या कारणामुळे बऱ्याचदा मुळव्याधीकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा मुळव्याधीमुळे दैनंदिन काम करणं अथवा बसणं कठीण जाऊ लागतं, तेव्हा यावर उपचार करण्याकडे भर दिला जातो. तोपर्यंत मूळव्याधीची समस्या अधिकच वाढलेली असते. यासाठी प्रत्येकाला मुळव्याधीविषयी माहीत असणे फारच गरजेचे आहे. कारण वेळेवर उपचार केल्यास मुळव्याधा पासून नक्कीच मुक्तता मिळू शकते.                                        

सोमवारी सकाळी दहा ते एक वाजेच्या दरम्यान होणाऱ्या शिबिरामध्ये मराठवाड्यातील विविध भागातील मुळव्याध्येच्या रुग्णांसाठी मोफत मुळव्याधेवर उपचारासाठीची औषधी आणि उपचार करण्यात येणार आहेत.शल्यतंत्र विभागात मुळव्याधावर नियमितपणे संशोधन चालू असून  विविध प्रकल्प शल्यचिकीत्सा विभागातर्फे नियमितपणे राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून शल्यचिकीत्सा विभागातर्फे मूळव्याध, भगंदर, फिशर या सारख्या गुदविकारावर मोफत तपासणी आणि उपचार शिबीर आयोजन केले आहे. या शिबिरात रुग्णांना पुन्हा पुन्हा मुळव्याध होऊ नये, याकरिता जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरातील चिकीत्सक रुग्णांना मुळव्याध असणाऱ्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी व कोणते पथ्य पाळावे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतील.              

मोफत नावनोंदणीसाठी क्र. ०२४०-२६४६४६४, २३७९२४८, ७७७ ००५५८८६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या  शिबिरासाठी तज्ञ चिकीत्सक म्हणून डॉ. बी. एन. गडवे, डॉ. बी. के. तिम्मेवार, डॉ. ए. ए. भुजबळ, डॉ. आर.एन. गुंडरे, डॉ. पी. व्ही. बोचरे, डॉ. एस. व्ही. मोरे, डॉ. अंकिता सुकळेकर आणि डॉ. पी. एस. घोरपडे उपचार करणार आहेत. गरजुंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, शैक्षणिक प्रमुख डॉ. जयश्री देशमुख आणि रुग्णालय अधिक्षक डॉ. नरेश निंबाळकर यांनी केले आहे.