औरंगाबाद -पुणे महामार्गावरील नवीन कायगाव येथे कारवर कार आदळल्याने चार जण ठार

गंगापूर, १८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- औरंगाबाद- पुणे महामार्गावरील गंगापूर रोडवरील कायगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. स्विफ्ट आणि वॅग्नर कार एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार व पाच जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.नगर औरंगाबाद महामार्गावरील नवीन कायगाव येथे रात्री साडेनऊ दरम्यान एका स्विफ्ट कारमधून काही लोक नगरकडून औरंगाबादकडे जात होते. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडर चढून विरुद्ध दिशेला जाऊन औरंगाबादहुन नगरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅगनार कारवर आदळली.

औरंगाबाद -पुणे महामार्गावरील नवीन कायगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडे नऊ नेवासा येथुन बजाजनगरला जाणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच 20 सि एस 5982 कार चालकाचा ताबा सुटल्याने डिव्हायडर वर गाडी जाऊन औरंगाबाद हुन नेवासा कडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅगनार क्रमांक एम एस 27 बी झेड 38 89 या कारवर आढळली असता बजाज नगर येथील स्विफ्ट कार मधील चार जणांचा जागेवर मृत्यू झाला यामध्ये रावसाहेब मोटे(५६)  सुधीर पाटील (४५) रा.वाळूज सिडको महानगर रतन बेडवाल (३८) रा. वाळूज यांच्या सह एकाचा समावेश आहे तर व्हॅगनार मधील शशीकला कोरट, सिध्दांत जंगले(१५),छाया हेमंत  जंगले(४०) शकुंतला जंगले(७०) राहणार अमरावती हे गंभीर जखमी झाले. जखमींना नेवासा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले तर मृत झालेल्या चार जणांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले घटनास्थळी गंगापूर पोलीस निरीक्षक अशोक चौरे पोलीस राहुल वडमारे आदीसह पीएसआय प्रकाश जाधव, पीएसआय काकासाहेब नागवे, स फौजदार प्रकाश मोहिते, पो ना ईश्वर जारवाल, महामार्ग पोलीस केद्र औरंगाबाद यांनी घटनास्थळी भेट  दिली आहे व वाहतूक सुरळीत केली.