वैजापूर तालुक्यात विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर, १८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील रघूनाथपुरवाडी, मनुर व खिर्डी कन्नड या गावांतील विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या 3 कोटी 83 लक्ष 48 हजार रुपये निधीच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आ.बोरणारे यांच्याहस्ते शुक्रवारी (ता.18) झाले.

मौजे रघुनाथपुरवाडी येथे जलजीवन (10 लक्ष रुपये) कामांचे भूमिपूजन. सामजिक सभागृह (5 लक्ष रुपये) कामांचे लोकार्पण. शिवूर-बोरसर रस्ता ते वाडी रस्ता दुरुस्ती (5 लक्ष रुपये कामाचे लोकार्पण. मनुर ते पोखरी रस्ता दुरुस्ती (2 कोटी रुपये) डांबरीकरण कामाचे भूमिपूजन.  जलजीवन (51.98 लक्ष रुपय कामाचे लोकार्पण. मंगल कार्यालय (25 लक्ष रुपये) बांधकामांचे भूमिपूजन. 2 नविन शाळा खोली (22 लक्ष रुपये) बांधकामाचे भूमिपूजन. पशूवैद्यकीय दवाखाना इमारत (10 लक्ष रुपये) कामाचे लोकार्पण.तिर्थविकास संत स्वामी जनार्दन महाराज सुशोभिकरण (10 लक्ष रुपये) कामाचे लोकार्पण.

प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत दुरूस्ती (5 लक्ष रुपये) कामाचे भूमिपूजन. गावअंतर्गत सिमेंट रस्ता (2.5 लक्ष रुपये) कामाचे भूमिपूजन. मौजे खिर्डी कन्नड येथे जलजीवन यौजना (13 लक्ष रुपये) कामाचे भूमिपूजन. खिर्डी कन्नड ते मालेगाव रस्ता (7 लक्ष रुपये) कामाचे लोकार्पण. आदिवासी वस्तीवर नळकांडी पुल (5 लक्ष रुपये) कामाचे भूमिपूजन. स्मशानभुमी शेड (4 लक्ष रुपये) कामाचे भूमिपूजन.

दलितवस्ती-फुलेवाडी रस्ता मजबुतीकरण (4 लक्ष रुपये) कामाचे भूमिपूजन.  शाळा खोली दुरूस्ती (3 लक्ष रुपये) कामाचे भूमिपूजन. स्ट्रीट लाईट बसविणे (1 लक्ष रुपये) कामाचे लोकार्पण अशा एकुण 3 कोटी 83 लक्ष 48 हजार रुपयांचा निधी मंजुर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आ.रमेश बोरणारे यांच्या हस्ते झाले.           

याप्रसंगीं उपनगराध्यक्ष साबेरखान, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, जिल्हा बँक संचालक रामहरी  जाधव, शहरप्रमुख पारस घाटे, उपसभापती राजेंद्र  चव्हाण, उपतालुकाप्रमुख पी. एस. कदम, गोकुळ  आहेर, युवासेना उपजिल्हाप्रमुख भरत कदम, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, विभागप्रमुख प्रभाकर जाधव, उपकार्यकारी अभियंता कोयलवार,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कोलते मॅडम, उपविभागप्रमुख अंबादास खोसे, संतोष  दौंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.