मंत्रालयात बीड जिल्ह्यातील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई ,१७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- मंत्रालयामध्ये एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळी मुळे सदर तरुणाचा जीव वाचला.

तीन वर्षांपूर्वी त्याच्या प्रेयसीवर अतिप्रसंग झाला असून याबाबत त्याला न्याय मिळत नसल्याने त्याने कृत्य केले असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुणाचे नाव बापू मोकाशी असा असून त्याचे वय ४३ वर्ष एवढे आहे.तो बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी आहे.

आपल्या प्रेयसीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला अटक व्हावी आपल्याला न्याय मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण चार पत्र लिहिली होती. तरीही अद्याप आपल्याला न्याय मिळाला नाही. यासाठी आपण आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे त्या तरुणाने सांगितला आहे.

बापू मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली मात्र मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लावलेल्या जाळीत हा तरुण अडकला त्यामुळे या तरुणाला गंभीर इजा झाली नाही मात्र उडी मारल्यानंतर या तरुणाच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे.