औद्योगिक संघटनांतर्फे दुस-यांदा आयोजित केलेल्या ॲटीजन टेस्टींग कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद

औरंगाबाद, दिनांक 20 :चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर(सी.एम.आय.ए.) तर्फे गुरूवार दि. २० ऑगस्ट २०२० रोजी  दुस-यांदा एक दिवसीय कोरोना ॲटीजन टेस्टींग कॅंम्प चे आयोजन मराठवडा ॲटो क्लस्टर, वाळूज येथे करण्यात आले होते.या उपक्रमात वाळूजमधील  विविध औद्योगिक घटकांत कार्यरत असणा-या बहुतांश लोकांची  ॲटीजन टेस्ट करण्यात आली.

 या प्रसंगी सतिश लोणिकर म्हणाले की, वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योगांमध्ये काम करणारे कामगार तसेच इतर अधिकारी स्वता:हून ॲटीजन टेस्ट करून घेत आहेत. तसेच जर कोणी बाधीत अढळल्यास उपचार करून घेण्यास तयार आहेत. याहून असे दिसून येते की ’कोरोना ला घाबरून नाही तर कोरोना शी लढा देऊन त्यावर मात करता येते ह्या बद्दल उद्योग जगत सहमत आहे.अशा प्रकारचे कॅम्प दर अठवड्याला आयोजित करण्यात येतील असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले जेणेकरून जास्तीत जास्त लोकांची तपसाणी करून बाधीत व्यक्ती पर्यंत पोहोचता येईल व ज्यामुळे कोरोनाचा संभाव्य प्रसार रोकण्यासाठी मोट्या प्रमाणात सहाय्य होईल.

 हा कॅंम्प यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सी.एम.आय.ए. चे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू,  सचिव सतिश लोणीकर, सी.आय.आय. चे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, मसिआ चे अध्यक्ष अभय हंचनाळ, सचिव राहुल मोगले यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच औरंगाबाद महानगर पालिकेचे अधिकारी मोईन व त्यांचे सहायक उपस्थित यांनी विशेष प्रयत्न केले. अशा प्रकारचे कॅम्प औद्योगिक परिसरात आयोजित करण्यास औरंगाबाद महानगर पालिकेची टीम सुसज्ज आहे.

 या उपक्रमामुळे औद्योगिक घटकांमध्ये तसेच कार्यरत लोकांमध्ये कोरोना विषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली.कोरोना ची साखळी तोडण्यासाठी या कॅंम्पचा निश्चितच उपयोग होईल असे मत उपस्थित व सहभागी उद्योग घटकांनी तसेच आयोजकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *