जालना जिल्ह्यात 38 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 20 :- जालना शहरातील 96 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.जालना शहरातील एकुण 31 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 7 अशा एकुण 38 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9434 असुन सध्या रुग्णालयात -195 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3490, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-283,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-27589 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 38(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3888 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-23291, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 320, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2971

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -32, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3064 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती – 35 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-416,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -195आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 92,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-96 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2561, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1214 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-44187 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 113एवढी आहे.

आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात जालना शहरातील अंबर हॉटेल परिसरातील 78 वर्षीय महिला व नुतन वसाहत परिसरातील 85 वर्षीय पुरुष आहेत.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 37नागरीकांकडून 13 हजार 100 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 127 नागरिकांकडुन 8 लाख 82 हजार 660 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *