वैजापूर शहरातील विविध विकास कामासंदर्भात माजी नगराध्यक्ष साबेर खान यांचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना निवेदन

वैजापूर, १४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर शहर व ग्रामीण भागातील विविध विकास प्रश्नासंदर्भात माजी नगराध्यक्ष साबेरखान अमजद खान यांनी सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेतली व मागण्याचे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी साबेर खान व त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. काकर समाजाचे शमीम सौदागर, अशोक चांदकर आदी यावेळी उपस्थित होते.