औरंगाबाद भाजप लोकसभा संयोजकपदी समीर राजूरकर

औरंगाबाद,१३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-औरंगाबाद भाजप लोकसभा मतदार संघाच्या संयोजकपदी जिल्हा सरचिटणीस, माजी नगरसेवक समीर राजूरकर यांची नियुक्ती झाली आहे. रविवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या लोकसभा पूर्वतयारी बैठकीत संघटनमंत्री संजय कौडगे यांनी हा निर्णय जाहीर केला.

राजूरकर यांच्यावर आगामी लोकसभा निवडणुकीत संघटना मजबूत करणे तसेच कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये समन्वय राखून , अधिकाधिक मतदान करवून घेणे, प्रचार यंत्रणा राबवणे, व नियोजन अशी प्रमुख जबाबदारी असेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत असतील. केंद्रीय अर्थ मंत्री .खा. डॉ.भागवत कराड, केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री खा.रावसाहेब दानवे पाटील , सहकार व ओबीसी कल्याण व इतर मागासवर्गीय मंत्री आ. अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी राजूरकर यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.