लोभी पुरूषाचं समाधान न झाल्यामुळे त्याच्या चित्ताला कधीच चैन पडत नाही

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

लोभ धार बाहर रहे, जग विषयन​ ​महॅं रात । 

और मिले कुछ और हो, लोभ​ बढ़त दिन रात ।।१०।।

(स्वर्वेद तृतीय मण्डल नवम​ ​अध्याय) ०३/०९/१०

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

संसारातील विषयांच्या प्राप्तीसाठी लोभाची धार सदैव बाहेर प्रवाहीत असते आणि विषयासक्त जीव सदैव प्रकृती-मुख म्हणजेच बहिर्मुख होऊन जातो ; अंतरंगाचे त्याला भान रहात नाही. सदैव भोगाची इच्छा मनात असते. संतोष होत नाही. लोभ दिवसेंदिवस वाढत जातो.अजून काही मिळेल ही अपेक्षा सदैव वाढत जाते. लोभी पुरूषाचं समाधान न झाल्यामुळे  त्याच्या चित्ताला कधीच चैन पडत नाही.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org