गुजरात काँग्रेसचा जाहीरनामा घोषित:१० लाख नोकऱ्या, मोफत वीज आणि ५०० रुपयांत गॅस सिलेंडर!

अहमदाबाद : गुजरातमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आज जाहीरनामा घोषित केला. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी अशोक गहलोत यांनी गुजरात निवडणुकीसाठी हा जाहीरनामा प्रस्तूत केला आहे. यामध्ये १० लाख नोकऱ्या आणि ३०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासह ५०० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर, मुलींसाठी आरक्षण आणि ३ हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्यात येतील, सरकारी विभागांमध्ये आऊटसोर्सिंग बंद करुन जुनी पेन्शन सुरु करण्यात येईल, हे मुद्दे जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे की, राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर रिक्त असलेले सर्व सरकारी पदं भरण्यात येतील. यामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात येईल.