औरंगाबाद जिल्ह्यात 299 कोरोनाबाधित रुग्णांची भर ,7 मृत्यू

जिल्ह्यात 14452 कोरोनामुक्त, 4098 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 18 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 235 जणांना (मनपा 117, ग्रामीण 118) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 14452 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 299 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19152 झाली आहे. आजपर्यंत एकूण 602 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4098 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुपारनंतर 105 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 22, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 41 आणि ग्रामीण भागात 41 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रांजणगाव,शेणपूजी येथील 42, बिडकीन येथील 75वर्षीय पुरूष, सिद्धार्थ उद्यान परिसरातील 73 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात मंजित नगरातील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.घाटीत रमा नगर, क्रांती चौक येथील 38 वर्षीय पुरूष, बाबरा, फुलंब्रीतील 45 आणि खासगी रुग्णालयात 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा (65) हर्सुल टी पॉइंट (5), स्नेह नगर (1), कोमल नगर, पडेगाव (1), हायकोर्ट कॉलनी (1), हर्सुल चेक पॉइंट (1), एन पाच सिडको (1), अन्य (3), सिग्मा हॉस्पीटल परिसर (3), शहागंज (1), बन्सीलाल नगर (1)मुकुंदवाडी (1), भावसिंगपुरा (1), जुना मोंढा, नवाबपुरा (1), पवन नगर, हडको (1), बायजीपुरा (1), रेल्वे स्टेशन (1), म्हाडा कॉलनी (2), उल्का नगरी, गारखेडा (2), पुंडलिक नगर (1), बालाजी नगर (1), नक्षत्रवाडी (1), सिग्मा हॉस्पीटल परिसर (4) अन्य (2), एसटी कॉलनी (1), क्रांती नगर, बालाजी नगर (1), सुधा अपार्टमेंट, देवगिरी कॉलनी (2), म्हस्के पेट्रोल पंप परिसर (1), शांती नर्सिंग होम परिसर, कांचनवाडी (1), शेंद्रा एमआयडीसी (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1), राम नगर (1), सातारा परिसर (1), वैजंयती नगर (1), एन सहा सिडको (1), एन आठ, निलानंद सो., (2), आयोध्या नगर (1), जय भवानी नगर, एन चार सिडको (1), इलियास कॉलनी (1), हर्सुल टी पॉइंट (11)

सिटी एंट्री पॉइंट (22) शिवशंकर कॉलनी (2), उल्कानगरी (1), सोयगाव (1), नक्षत्रवाडी (3), किनगावराजा (1), एन नऊ शिवनेरी कॉलनी (2), केंब्रिज विद्यालय परिसर (1), एन अकरा सिडको (1), जटवाडा (2), मयूर पार्क (2), छावणी (2), बेगमपुरा (1), पडेगाव (2), बीड बायपास (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *