“केंद्रीय तपास यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागतात”; उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका

उद्धव ठाकरे म्हणतात, संजय माझा जिवलग मित्र…

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे सूचक विधान, पुन्हा एकदा कटुता संपवण्याचे संकेत

शिवसेनेचा हा रोखठोक आवाज आता पुन्हा बुलंद होणार!

मुंबई,१० नोव्हेंबर /प्रतिनिधी :- पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत हे जामिनावर आता आभार आले आहेत. यानंतर त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. गेटजवळ येताच आदित्य ठाकरे यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. यावेळी शिवसैनिकही भावुक झाले होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला.

संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हंटले की, “संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे. तो शिवसेनेसाठी लढला आणि अजूनही लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाही.” संजय राऊतांना पुन्हा खोट्या प्रकरणात अडकवलं जाऊ शकत, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.

“केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यासारख्या वागत आहेत. संपूर्ण देश हे सगळं बघत आहे. न्यायदेवता आपल्या अंकित करण्याची सुरुवात केंद्र सरकार करते की काय अशी भीती आहे. सर्वसामान्यांच्या आशेचा किरण न्यायालय असते. आणि न्यायालय आपल्या आधी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल तर सगळ्यांनी विरोध करायला हवा. आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले.” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

जामीन मंजूर झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यांचे स्वागत रश्मी वहिनी ठाकरे यांनी औक्षण करून केले.

संजय राऊत आज सांगितले की, जेव्हा मी तुरुंगात होतो तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कटुता वाढली आहे, ती कमी करण्याची गरज असल्याचे बोलले होते. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करतो. त्याचवेळी राऊत म्हणाले, मी फडणवीस यांची भेट घेणार आहे, असे सांगितले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही प्रतिसाद आला आहे. तुम्ही संजय राऊत यांना भेटणार का, असा प्रश्नही फडणवीस यांना विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस यांनी सांगितले की, मी सगळ्यांना भेटतो. राऊत यांनी भेट मागितली तर त्यांच्याही भेट घेईल.

राज्यात एक नवीन सरकार स्थापन झालं आहे. मी मागील तीन महिन्यांपासून जेलमध्ये होतो आणि आता बाहेर आलोय. या सरकारने काही चांगले निर्णयही घेतले आहेत. मी त्यांचं स्वागतही करतो. फक्त विरोधासाठी विरोध आम्ही कधी करणार नाही. ज्या गोष्टी राज्यासाठी, देशासाठी आणि इथल्या लोकांसाठी चांगल्या असतात त्यांचं नेहमी स्वागतच केलं पाहिजे, असे राऊत म्हणाले होते. 

राज ठाकरे यांना संजय राऊत यांचा जोरदार टोला, ‘अशा भावना व्यक्त… 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी एका भाषणामध्ये सागितले होते की, संजय राऊत यांना लवकरच अटक होणार आहे. त्यांनी एकांतात राहण्याची प्रॅक्टीस करावी.  या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मला राज ठाकरे यांना सांगायचे आहे, सावरकरही तुरुंगात होते. लोकमान्य टिळकही तुरुंगात होते. आणीबाणीत अनेकांना अटक केली. मात्र, मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती, असे न्यायालयाचे मत आहे. मी जेलमध्ये होतो. तुरुंगात मी एकांतात होतो. मी एक सांगतो, राजकारणामध्ये शत्रूच्या संदर्भात तुरुंगात जाण्याच्या भावना व्यक्त करु नये. आता तुरुंगातील एकांतातील वेळ सत्कारणी लावणार आहे, असा टोला राऊत आंनी राज ठाकरे यांना लगावला. दरम्यान, तीन महिन्यांच्या दिवसांचा अनुभव इतक्या लवकर सांगण्यासारखा नाही, असे राऊत यावेळी म्हणाले.