शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत

मुंबई : प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत, अशी अधिकृत माहिती त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी दिली. परंतु शरद पवार जरी सहभागी होणार नसले तरी इतर काही नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. या यात्रेसाठी काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहतील, अशी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसकडून माहिती देण्यात आली होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार सहभागी होणार नाहीत. परंतू राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. तर राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे हे बुलढाणा आणि हिंगोली येथे रोहित पवार सहभागी होणार आहेत.

तर उद्याच्या राहुल गांधी यांच्या सभेला शिवसेनेकडून आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेसाठी जाण्यासाठी उत्सुक देखील आहेत. त्या दृष्टीने तयारी देखील करण्यात आली आहे. सभा आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत.