जालना जिल्ह्यात 115 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 18(जिमाका) :- जालना शहरातील एकुण 82 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तर अँटीजेन तपासणीद्वारे 33 अशा एकुण 115 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9347 असुन सध्या रुग्णालयात -215 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3436, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-275,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-26089 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 115 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3793 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-21998, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 208, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2910

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-2986 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती – 104 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-559,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-25, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -215,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 141,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-57 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2406, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1279 (20 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-41739 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 108 एवढी आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 61 नागरीकांकडून 12 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 46 नागरिकांकडुन 8 लाख 61 हजार 760 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *