जगभरात दाटलेल्या निराशेच्या मळभात भारत एक उज्ज्वल आशेचा किरण – वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी प्रत्येकाने नि:स्वार्थपणे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अहिंसा विश्व भारतीची राष्ट्रीय परिषद मुंबईत सुरु

मुंबई,​६​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-अहिंसा विश्व भारती राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.  ही परिषद आज, 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोयल यांनी भारताच्या विश्वगुरू बनण्याचे  ध्येय अधोरेखित केले.  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आचार्य डॉ. लोकेश मुनी आणि अहिंसा विश्व भारतीचे इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

संत आणि ऋषी अशी ठिणगी पेटवतात जी  एखाद्याचे कार्य प्रज्वलित करते असे पियुष गोयल यावेळी म्हणाले. आपल्याला कधीकधी आपल्या कर्तव्याची आठवण करून देण्याची गरज असते आणि संत तेच करतात. कर्मकांडात अडकून न पडता धर्माला दैनंदिन जीवनाशी जोडणे आवश्यक आहे आणि डॉ. लोकेश यांच्यासारखे आचार्य आदर्श उदाहरण आहेत असे गोयल म्हणाले.

देशाच्या विश्वगुरु होण्याच्या ध्येयाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हर घर तिरंगा सारख्या कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशाचा उल्लेख केला. राष्ट्रध्वज फडकला नसेल असे एकही घर सापडणे जवळपास अशक्य होते. निराशेच्या मळभातील भारत आशेचा उज्ज्वल किरण असून प्रत्येक भारतीय देशाच्या प्रगतीचा साक्षीदार आहे असे त्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारत म्हणून जागतिक पातळीवर भारताची वेगळी ओळख निर्माण होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे. सर्वांनी देशहितासाठी निष्ठेने सामाजिक कार्य करावे. अहिंसा विश्वभारती संस्थेने समाज राष्ट्र आणि संपूर्ण जगात शांतता आणि सद्भावना प्रस्थापित करून धर्माला समाजसेवेची आणि अध्यात्मतेची जोड देऊन सामाजिक दृष्कृत्यांचे निर्मूलन करण्याचे माध्यम बनवले. अहिंसा विश्व भारती आणि विश्वशांती केंद्र ही संस्था राष्ट्रीय चारित्र्य निर्माण, मानवी मूल्यांच्या उन्नतीसाठी आणि अहिंसेच्या प्रचारासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. देशाच्या विकासासाठी सामाजिक एकता, अखंडता महत्वाची आहे. असेही श्री गोयल यांनी सांगितले

अहिंसा विश्व भारती तसेच विश्व शांति केंद्राच्या स्थापना दिवस निमित्त राज्यपाल श्री. भागतसिंह कोश्यारी  आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक गुरुदेव राकेश भाई राजचंद्र मिशन धरमपुर,जिओ अपेक्सचे पृथ्वीराज कोठारी ,संजय फाऊंडेशनचे संजय घोडावत यांना अहिंसा आतंरराष्ट्रीय अवार्ड २०२२  देऊन सन्मानित करण्यात आले.

अहिंसा विश्व भारती राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.  ही परिषद आज, 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोयल यांनी भारताच्या विश्वगुरू बनण्याचे  ध्येय अधोरेखित केले.  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आचार्य डॉ. लोकेश मुनी आणि अहिंसा विश्व भारतीचे इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.