हे शरीर विनाशशील आहे:स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

अंजुलि जल क्षण क्षण घटै, नश्वर तनु सो जाय । 

तिमि आयू पल-पल घटै, फेन ऊठ गलि जाय ।।१८६।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय)०६/०६/१८६

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद  :

ज्याप्रमाणे ओंजळीतील पाणी थेंबाथेंबाने खाली गळून पडून संपून जात आहे त्याप्रमाणेच हे शरीर विनाशशील आहे. शरीराचं आयुष्य प्रतीक्षण कमी कमी होत आहे आणि एक दिवस हे आयुष्य संपून मृत्यू होणार आहे. ज्याप्रमाणे  पाण्यावर आलेला फेस काही काळ त्यावर राहून पुन्हा पाण्यात विलीन होणार आहे, तद्वतच जीवांचं शरीर क्रमशः जन्म, स्थिती आणि मृत्यू  प्राप्त करीत आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org