दिग्दर्शक निशिकांत कामतचे हैदराबादमध्ये निधन

Nishikant Kamat Movies: Bollywood Marathi Director Passes Away ...

मुंबई, 
‘डोंबिवली फास्ट’, ‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामतचे नुकतेच हैदराबाद येथे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती आणि त्याच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्याची आज सोमवार प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनामुळे हिंदी मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चित्रपट जगतात काही आव्हानात्मक आणि तितक्याच रंजक कथानकांना हाताळत दर्जेदार कलाकृती सादर करणाऱ्या आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या निशिकांत कामत यांचं वयाच्या ५० व्या वर्षी निधन झालं.अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विटकरून ही माहिती दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीत बिघाड झाल्यामुळं त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना काही काळापूर्वी Liver Cirrhosisचा त्रास होता. ज्यानंतर पुन्हा एकदा त्यांना हा त्रास सतावू लागला होता. ‘डोंबिवली फास्ट’च्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारालाही कामत यांनी गवसणी घातली. पुढं जॉन अब्राहमच्या ‘रॉकी हँडसम’ चित्रपटात ते खलनायकी भूमिकेत दिसले होते. त्यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘लय भारी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली होती. ‘सातच्या आत घरात’, या चित्रपटातून त्यांनी साकारलेला ‘अनिकेत’ बराच गाजला होता. २०२२ साली त्यांचा ‘दरबदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणं अपेक्षित होतं.

‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘मुंबई मेरी जान’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला. त्याआधी ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव साऱ्या महाराष्ट्राला परिचयाचं झालं होतं. 

संवेदनशील अभिनेता, गुणी दिग्दर्शक गमावलामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिग्दर्शक कामत यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १७ :- ‘चित्रपट माध्यमावर प्रेम करणारा उमदा आणि संवेदनशील अभिनेता, गुणी दिग्दर्शक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता, दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रपट सृष्टीसाठी आवश्यक अशी हरहुन्नरी कौशल्ये बाळगणाऱ्या निशिकांत कामत यांचा प्रवास अनेक होतकरूंसाठी प्रेरणादायी असा आहे. मराठी चित्रपटाद्वारे कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कामत यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले असे स्थान निर्माण केले. डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या कामत यांचे अवेळी जाणे चित्रपट सृष्टीसाठी नुकसानीचे आहे. चित्रपट माध्यमावर प्रेम करणारा उमदा, संवेदनशील अभिनेता, गुणी दिग्दर्शक आपण गमावला आहे. निशिकांत कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख

मुंबई, दि.17 : मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणारे निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी चटका लावून जाणारी आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

श्री.देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आजच्या काळातील चित्रपट बनविताना प्रेषकांना नेमके काय हवे हे त्यांना नेमके माहित होते. गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती बिघडली होती आणि त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. श्री.कामत यांच्या निधनाची बातमी चटका लावून जाणारी असून त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे आपल्या कायम स्मरणात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *