जीवनात भोगाची इच्छाच पतन आणि अत्यंत दुःखाचं कारण:स्वर्वेद द्वितीय मण्डल चतुर्थ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

तप्त लोह के पिण्ड सम, भोग सकल जग जान । 

मुख बाये मुख जरहिंगे, कष्ट विविध अज्ञान ।।५८।। 

(स्वर्वेद द्वितीय मण्डल चतुर्थ अध्याय) ०२/०४/५८

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

तप्त लोखंडासमान संसारातील समस्त विषय भोग आहेत. त्यांना भोगण्यासाठी जेव्हा तोंड उघडले जाईल तेव्हा ते जळून दग्ध होऊन जाईल. जीव अज्ञानाने या विषय-भोग-रूपी अग्नीत जळून विविध प्रकारच्या दुःखांना प्राप्त करीत आहे. जीवनात भोगाची इच्छाच पतन आणि अत्यंत दुःखाचं कारण आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org