नांदेडमध्ये 81 बाधितांची भर तर दोन महिलांचा मृत्यू

नांदेड दि. 17 :- सोमवार 17 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 63 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 81 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 43 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 38 बाधित आले.

आजच्या एकुण 436 अहवालापैकी 344 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 4 हजार 187 एवढी झाली असून यातील 2 हजार 477 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 534 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 184 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.रविवार 16 ऑगस्ट रोजी सरपंचनगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात तर सोमवार 17 ऑगस्ट 2020 रोजी उमरी तालुक्यातील गोरठा येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 149 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या एकूण 63 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 43 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 38 बाधित आढळले.जिल्ह्यात 1 हजार 534 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 516,घेतलेले स्वॅब- 30 हजार 217,निगेटिव्ह स्वॅब- 24 हजार 36,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 81,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 187,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 4,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1,एकूण मृत्यू संख्या- 149, एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 477,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 534,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 443, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 184.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *