वेदांता फॉक्सकॉनसह समृद्धी महामार्गावरुन सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती; रोखठोक आदित्य ठाकरे

मुंबई,३१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्रातून चार प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र करीत आहे. यापूर्वीही आदित्य ठाकरे यांनी गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पावर सवाल उपस्थित केला होता. आता त्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेच्या काही वेळातच आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत प्रश्नांची सरबत्ती केली.

महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे. यानंतर फडणवीसांनी यावर स्पष्टीकरण दिलं. यानंतर काही वेळात आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

खर तर उत्तर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर अपेक्षित होते. २००० कोटीचा इलेक्ट्रिक हबची घोषणा. आपण घेऊ शकत होतो ते उद्योग घालवले. वेदांतापेक्षा मोठा उद्योग मिळेल असे आश्वासन. दीड लाख कोटी आणि २ हजार कोटी यात अंतर. अशा घोषणा कधी झाल्याचे ऐकिवात नाही. ते आकड्यांच्या खेळात तरबेज.

त्यात एक रायगड प्रकल्पाचा उल्लेख हा ट्वीट २५ मे २०२२ चा आहे. तेव्हा मविआ होती. तो आम्ही दावोसला असतांना एमोयु सही झाले. याचे श्रेय आज ते घेताहेत

आजची प्रेस तद्दन खोटी. त्यांना चुकीची माहिती. फाॅक्सकाॅन बाबत जानेवारी २०२२ ची. तो प्रकल्प वेगळा तो तामिळनाडूला गेला. वेदांता फाॅक्सकाॅन मोबाईल साठी होता सेमी कंडक्टरचा नव्हता. त्यामुळे दिशाभूल करु नये.

वेदांता फाॅक्सकाॅन ५ जानेवारी २०२२

वेदांताने केंद्र सरकारने अप्रुव्हल दिले.

१९ जानेवारी रोजी देसाई साहेबांचे पत्र अग्रवाल यांना.

फेब्रुवारी २४ रोजी साईट विसिट तळेगावला.

३ मे फाॅक्सकाॅनची तळेगाव साईट विसिट

६ मे मी, देसाई साहेब आणि वेदांताची बैठक

२४ मे दावोसला अनिल अग्रवाल साहेबांची भेट

आम्ही महाराष्ट्रात येण्याची विनंती केली.

२४ जून फाॅक्सकाॅनच्या लोकांची आमची दिल्लीत भेट

सरकार पडले.

शिंदेंनी फाॅक्सकाॅनला पत्र लिहिले.

१० हजार पेक्षा अधिक सबसिडी मविआने दिली गुजरात पेक्षा अधिक.

मग २०२१ सालीच ते जाणार होते तर २०२२ साली ज्या बैठका झाल्या त्याचे काय?

दोन वेगळे प्रकल्प. हे सरकारसारखेच खोटे आहे. मुख्यमंत्री विधिमंडळात बोलले एकेरी उल्लेख केला हे स्मरणात. 

बल्क ड्रग पार्क मेडिकल डिवाईस पार्क दोन प्रस्ताव दिले गेले August महिन्यात.

देसाई साहेबांचे tweets आहेत. निती आयोगची भेट घेतली. त्यात उल्लेख डिफेंस पार्क आणि बल्क ड्रग पार्क जुन २०२१ 

एअर बस बाबत खोटे बोलले. त्यांनी जाहीर करावे अधिकाऱ्यांचे नाव जे उपमुख्यमंत्र्यांना म्हणाले मविआ काळात वातावरण चांगले नाही माझे आव्हान आहे.

मग गडकरी साहेबांनी का पत्र लिहिले. उद्योगमंत्री सामंत स्वतः बोलले आहेत. 

मुख्यमंत्र्यांना आव्हान समोरासमोर बोलावे चर्चा करावी. सर्व परिस्थिती अनुकूल असून प्रकल्प का बाहेर गेले. तुम्ही बल्क ड्रग पार्क इतरांना दिला पण महाराष्ट्रात दिला नाही. मविआ काळात साडे सहा लाखांची गुंतवणूक आणली. आम्ही असतो तर प्रकल्प आणले असते. पत्रकारांना एचेमव्ही म्हणाले. बेरोजगारांना शेमडी पोर संबोधले. जे आवाज उठवतात त्यांच्यावर निंदनीय टीका.

मविआ काळात १ मे २०२२ समृध्दीमहामार्ग उद्घाटन ठरले होते. तो पूल खरच पडला होता का?  अद्यापही त्याचे उद्घाटन नाही. मुख्यमंत्री यांनी यावर खुलासा करावा.

२०२१ चा आपला प्रस्ताव. आपल्या राज्यात २५६ फार्मसी काॅलेज, व्हॅक्सीन, स्कील्ड लेबरस

आता त्यांचे खोटे आरोप सुरु आहेत कारण त्यांची गद्दारी समोर आली म्हणून. फडणवीस पहिल्यांदा इतक्या दिवसानंतर का समोर आले? 

तुम्ही मविआ आणि गुजरात सरकारची पाॅलिसी तपासून बघा. दोन सेक्टर अपयशी. पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मागितले हे सरकार असतांना. हे खोके सरकारचे अपयश.

उपमुख्यमंत्र्यांना समोर केले. मुख्यमंत्री काहीच बोलत नाही. बच्चुकडुंच्या विधानाची चौकशी होणे गरजेचे. 

सत्य परिस्थिती समोर यावी. राखरांगोळी होणारे प्रकल्प आणले जातात. नाणार बाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट. जनसुनावणी करावी जनतेचे जे मत तेच आमचे मत.

कॅगच्या चौकशीचे स्वागत. महाराष्ट्र, मुंबई बदनाम करण्याचे षडयंत्र. सर्वांनी मुंबई, महाराष्ट्राची काळात केलेल्या कामांचे कौतुक. मग आता ठाणे, नागपूर मनपाची पण चौकशी करा अशी आमची मागणी.

मविआ काळातले सगळी गुंतवणूक बांधकामाच्या स्तरावर एक दोन चीनचे प्रकल्प वगळता. वेदांता फाॅक्सकाॅनला तीनदा मविआ काळात प्रतिसाद त्यांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद.

इलेक्ट्रिक हब हा देसाई साहेबांनी प्रयत्न केला तो आज जाहीर झाला. महाराष्ट्रात कृषी आणि उद्योग खाते महत्वाचे. उद्योग मंत्री काहीच करु शकत नाहीत. मुख्य विषयाकडून लक्ष हटवण्याचे प्रकार. आमच्या राज्यातून गुणवत्ता असून प्रकल्प इतर राज्यात. त्यावर कुणी बोलले तर शेंबडी पोर, हिस मास्टर वाॅईस म्हणून हिणवले जाते.  पुलाच्या दुर्घटनेबाबत चौकशी व्हावी.