देशातील कोविड मृत्यूदर 2 % च्या खाली,जवळपास 3 कोटी कोविड चाचण्या

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020

कोविड-19 मुळे बळी पडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आजअखेर भारताचा मृत्युदर हा जगात  सर्वात कमी मृत्युदर दर असणाऱ्या काही देशाइतका म्हणजेच 1.93% इतका झाला आहे. केंद्र आणि राज्य तसेच  केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.50,000 मृत्यूसंख्या ओलांडायला अमेरिकेला 23 दिवस, ब्राझीलला 95 दिवस आणि मेक्सिकोला 141 दिवसांचा अवधी लागला तर या संख्येपर्यंत पोचण्यासाठी भारताला 156 दिवस लागले.

केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारांचे रुग्णालयांमधील सुधारित आणि प्रभावी वैद्यकीय उपचार, देखरेखीसह घरातील विलगीकरण, ऑक्सिजनचा सौम्य प्रमाणातील वापर आणि रूग्णांना त्वरित व वेळेवर उपचार देण्यासाठी रुग्णवाहिकांच्या सुधारित सेवांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. आशा सेविकांचे अथक प्रयत्नांमुळे प्रभावीपणे देखरेख ठेवणे आणि घरामध्ये विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीच्या प्रगतीचा आढावा घेत राहणे शक्य झाले आहे. नवी दिल्लीमधील  एम्सच्या  संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांच्या दूरभाष माध्यमातून झालेल्या मार्गदर्शक सत्रामुळे कोविड– 19 च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे वैद्यकीय व्यवस्थापन कौशल्य अद्ययावत झाले आहे. या उपायांमुळे गंभीर आणि गुंतागुंतीच्या रुग्णांसाठी एकत्रित आणि अखंड तसेच कार्यक्षम रुग्ण व्यवस्थापन घरोघरी रुग्णालयांपर्यंत सुनिश्चित केले गेले आहे. त्यामुळे हे सुनिश्चित झाले आहे की भारताचा प्रकरण मृत्यू दर (सीएफआर) जागतिक सरासरीच्या खाली राखला जाईल.

चाचणीची आक्रमकपणे यशस्वी अंमलबजावणी करणे, उपाययोजनांच्या व्यापकतेने संपूर्णपणे आढावा घेणे आणि चाचणी करणे, यामुळे रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण देखील सातत्याने वाढते राहिले आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास 72 %  पर्यंत पोहोचला आहे, तो आणखी वाढेल, याची खात्री असून अधिकाधिक रुग्ण बरे होतही आहेत. गेल्या 24 तासात 53,322 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे, या संख्येसह बरे झालेल्या कोविड-19 रुग्णांची संख्या 18.6 लाखांपेक्षा (18,62,258) जास्त झाली आहे.

बरे होण्याच्या रुग्ण संख्येत निरंतर वाढ होत असल्यामुळे हे निश्चित झाले आहे की देशातील रुग्णसंख्येच्या टक्केवारीचे प्रमाण आता कमी होत आहे. सध्याचे सक्रीय रुग्ण (6,77,444)  देशातील वास्तविक रुग्णसंख्या दर्शवितात. आजच्या एकूण  पॉजिटीव  प्रकरणांपैकी ही 26.16 टक्के आहे, गेल्या 24 तासांत ही नोंद कमी झाली आहे. ते सक्रिय वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

कार्यक्षम आणि आक्रमक चाचणींद्वारे भारत ३ कोटी कोविड चाचण्या पूर्ण करण्याकडे वेगाने वाटचाल करीत आहे, आतापर्यंत 2,93,09,703 नमून्यांची चाचणी घेण्यात आली आहे. तर, गेल्या 24 तासात 7,46,608 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सरकारी क्षेत्रातील  969 प्रयोगशाळेच्या आणि 500 खासगी प्रयोगशाळांमध्ये  अशा  एकूण 1,469  निदान करणाऱ्या प्रयोगशाळांच्या  जोडल्या जाणाऱ्या आणि वेगाने वाढणाऱ्या राष्ट्रीय नेटवर्कमुळे हे शक्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *