वैजापूर तहसील “आनंद शिधा” वाटपात जिल्हयात प्रथम ; पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार

वैजापूर,३० ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्य सरकारच्या दिवाळी सणानिमित्त गरजूंसाठी शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा उपक्रमांत सर्वोत्कृष्ट कार्य करून औरंगाबाद जिल्हयात प्रथम येण्याचे श्रेय प्राप्त झाल्याबद्दल स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने तहसीदार व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा शनिवारी आ. रमेश बोरणारे यांच्याहस्ते सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

तहसील कार्यालय सभागृह येथे झालेल्या या सत्कार कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी, माजी पंचायत समिती सभापती बाबासाहेब जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुक्यात एकुण 57 हजार शिधापञिकाधारक लाभार्थी असून त्यांना दिवाळी सणानिमीत्त राज्य सरकारच्यावतीने शंभर रुपयात साखर, रवा, पामतेल, चनादाळ असे प्रत्येकी एक किलो असलेला आनंद शिधा वस्तू असलेली कीट दिवाळी पर्यंत सर्व स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहच करून सर्व लाभार्थ्याना वाटप केल्याने हा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

राज्यातल्या गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारनं आनंदाचा शिधा हा आणलेला उपक्रम अवघ्या 100 रुपयांमध्ये शिधा देण्याचा कौतुकास्पद निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रत्येक गावांमध्ये व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत हा शिधा पोहचल्याने जनसामान्यांच्या घरात गोड दिवाळी साजरी झाल्याचे आमदार आ. बोरणारे यांनी यावेळी बोलतांना सांगितले व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदारांचे आभार मानले.

या प्रसंगी नगरसेवक पारस घाटे, स्वप्नील जेजुरकर, शैलेश चव्हाण, ज्ञानेश्वर टेके, नायब तहसीलदार मनोहर वाणी, भाऊसाहेब झिंजुर्डे, स्वस्त संघटनेचे अध्यक्ष भगवान व्यवहारे, पप्पू आहुजा, सुशील आसर, जितेंद्र पवार, प्रकाश वाघ, कमलेश आंबेकर, रमेश रमैय्या, शिवकुमार श्रीवास्तव, ऊत्तम बोरनारे, त्र्यंबक चव्हाण, देवराव मोईन, पवन चव्हाण सर्व सदस्य व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.