जालना जिल्ह्यात 111 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि. 16 :- जालना शहरातील एकुण 43 तर अँटीजेन तपासणीद्वारे 68 अशा एकुण 111 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9178 असुन सध्या रुग्णालयात -218 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3387, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-151,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-24737 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 111 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -3602 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-20862, रिजेक्टेड नमुने -39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने – 183, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2875.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-2916 आजअलगीकरण केलेल्या व्यक्ती – 46 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-690,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-30, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -218,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 84,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-63, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2293, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1201 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-40032 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या – 108 एवढी आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 16 नागरीकांकडून 3 हजार 300 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 3 हजार 942 नागरिकांकडुन 8 लाख 41 हजार 460 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *