नांदेडमध्ये 95 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू

नांदेड दि. 16 :- रविवार 16 ऑगस्ट रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 102 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 95 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 54 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 41 बाधित आले.

आजच्या एकुण 478 अहवालापैकी 360 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 4 हजार 106 एवढी झाली असून यातील 2 हजार 414 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 518 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 193 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

शनिवार 15 ऑगस्ट रोजी बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा, रविवार 16 ऑगस्ट रोजी मुदखेड येथील 35 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर देगलूर येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 147 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 102 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटले येथील 3, हदगाव कोविड केअर सेंटर 6, खाजगी रुग्णालय 11, किनवट कोविड केअर सेंटर 10, नायगाव कोविड केअर सेंटर 4, देगलूर कोविड केअर सेंटर 25, धर्माबाद कोविड केअर सेंटर 3, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 15, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय कोविड केअर सेंटर 2, अर्धापूर कोविड केअर सेंटर 11, कंधार कोविड केअर सेंटर 1 असे एकूण 102 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 41 बाधित आढळले.जिल्ह्यात 1 हजार 518 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीसर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 395,घेतलेले स्वॅब- 29 हजार 772,निगेटिव्ह स्वॅब- 23 हजार 622,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 95,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 106,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,एकूण मृत्यू संख्या- 147, एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 414,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 518,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 502, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 193.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *