वित्तीय समावेशन मोहिमेतून ग्रामीण भागाचे आर्थिकसशक्तीकरण करावे – भूषण कुमार सिन्हा

औरंगाबाद,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत बँका, वित्तीय संस्थाचा सहभाग महत्वाचा आहे.  ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांच्या आर्थिक उन्नतीसाठी वित्तीय समावेशनातून सशक्तीकरण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त विभागाचे सहसचिव भूषण कुमार सिन्हा यांनी आज बँकर्सच्या आढावा बैठकीत केले.

            या बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार, जिल्हा परिषद, कृषी विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सुचिता कोतकर यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, यूको बँक, ॲक्सीस बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सेंट्रल बँक याच्यासह इतर बँकचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे, तसेच विविध विम्याचा लाभ घेण्यासाठी देखील बँकेत खाते आवश्यक असल्याने ‘वित्तीय समावेशनातून सशक्तीकरण’ मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. या पथदर्शी मोहिमेत बँकांनी ग्रामपंचायत पातळीवर बँक तसेच शासकीय यंत्रणा याच्या सहकार्याने मोहिम राबवावी अशा सूचना भूषण कुमार यांनी उपस्थित बँक प्रतिनिधी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.

         जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी आर्थिक समावेशनातून सशक्तीकरण जिल्ह्यात 100 टक्के उदिष्ट्य पूर्ण करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनामार्फत केंद्रीय वित्त विभागाचे सहसचिव सिन्हा यांनी दिली.

            जिल्ह्यात 15 ऑक्टोबर पासून बँक शिबीराची सूरुवात झाली असून 29 आक्टोबर रोजी दुसरे शिबीर घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे डॉ.  केदार यांनी दिली. ग्रामपंचायत पातळीवर या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी बँकांनी जनजागृतीपर उपक्रम राबवित असल्याची माहिती देण्यात आली.