वैजापूर पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण 4 नोव्हेंबर रोजी निश्चित होणार

वैजापूर,२७ऑक्टोबर /प्रतिनिधी :- येत्या 4 नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग मुंबई यांनी अधिसूचनेतील अनुसुचीनुसार जिल्ह्यातील पंचायत समित्याकरिता त्यांना सद्यस्थितीत लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर लगेच येणाऱ्या दिवसांपासून अनुसूचित जाती/ जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग यामधील (महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या सभापतींची पदे नेमून दिलेली आहे.

त्यानुसार जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या करिता सभापतीपदाच्या आरक्षित पदाचे पंचायत समितीनिहाय वाटप करण्यासाठी 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे बैठक होईल. या बैठकीस सर्व राष्ट्रीय व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदव पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.