अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची व्हाईट हाऊसवर दिवाळी!

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यंदा व्हाईट हाऊसवर दिवाळी सणानिमित्त कार्यक्रम केला. या कार्यक्रमानिमित्त त्यांनी अमेरिकेत स्थायिक असलेल्या हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. व्हाईट हाऊसवर साजरे केले जाणारा हा पहिलाच दिवाळी उत्सव आहे. अमेरिकेतील स्थायिक हिंदूंनी दिवाळी साजरी करून आनंदमय वातावरण निर्माण केल्याबाबत जो बायडेन यांनी भारतीयांचे आभार मानले आहेत.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले. त्या यावेळी म्हणाल्या, जगभरातील 1 अब्ज लोकांना दिवा पेटवण्यासाठी आणि वाईटावर चांगल्या गोष्टींनी मात करण्यासाठी, अज्ञानावर ज्ञान आणि अंधारावर प्रकाशाने लढा देण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत.

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याच्या स्वागत समारंभात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले, “तुमचे यजमानपद भूषवण्याचा आम्हाला सन्मान वाटतो. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच दिवाळी रिसेप्शन आहे. आमच्याकडे सध्या पूर्वीपेक्षा जास्त आशियाई अमेरिकन आहेत आणि दिवाळी उत्सव आनंदाचा सण बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो.”
 जिल बायडेन यांनी अमेरिकेतील आशियाई अमेरिकन समुदायाला उद्देशून भाषणातअमेरिकेला प्रगती करण्यास मदत केल्याबद्दल अमेरिकी भारतीय समाजाचे आभार मानले. त्या वेळी त्या म्हणाल्या, ”मी तुमची कृतज्ञ आहे की आज या दिव्यांनी तुम्हाला या घरात विश्वास आणि प्रेमाने आमंत्रण देते आहे. हे घर जे तुमच्या सर्वांचे आहे.”