सूक्ष्म मायेतच सर्व सृष्टीचा विस्तार लपलेला-स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

साखा काटै क्या भयो, जो नहिं काटो मूल ।

सुक्ष्म बद्ध जबले रहे, मिटे न तबले शूल ।।१७३।।

वट का वृक्ष विशाल है, सूक्ष्म बीज है ताहिं ।

तैसे त्रिजग पसार है, अणू बीज के माहिं ।।१७४।। 

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय) ०६/०६/१७३, १७४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

वृक्षाची फांदी तोडल्याने काय लाभ होणार आहे ?  जोपर्यंत त्याचे मुळ छाटत नाही तोपर्यंत ते नष्ट होणार नाही. तद्वतच जोपर्यंत जीव सूक्ष्म मायेने आबद्ध आहे, तोपर्यंत नुसत्या स्थूल मायेच्या त्यागाने त्याच्या कष्टांची निवृत्ती होणार नाही. वटवृक्ष विशाल असतो पण त्याचं बीज अत्यंत छोटं असतं. त्याच प्रमाणे सूक्ष्म मायेतच सर्व सृष्टीचा विस्तार लपलेला आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org