सूक्ष्म,आंतरिक मायेचा त्याग कोणी कोणी संतच करतात

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

ॠषि मुनि और योगीश्वर, जंगल गुहा निवास । 

तिन कहॅं नाच नचाइया,सूक्ष्माभ्यन्तर वास ।।१७१।। 

मोटी माया बहु तजैं, सूक्ष्म तजैं कोइ सन्त ।

 ताहि कृपा जेहि जीव पर, तब छोड़े सोइ तन्त ।।१७२।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय) ०६/०६/१७१,१७२

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

ॠषि, मुनी तथा योगीश्वर, जे जंगल, गुहा, पर्वत आदि ठिकाणी तपस्यारत असतात, त्यांनाही ही आंतरिक माया नाचवते  अर्थात आपल्या जाळ्यात ओढून तपभ्रष्ट करते. स्थूल माया म्हणजे घर, परिवार, धन तसेच संपत्तीचा त्याग तर बरेच जण करतात, परंतु सूक्ष्म, आंतरिक मायेचा त्याग कोणी कोणी संतच करतात. परमेश्वराची आणि सद्गुरूंची कृपा ज्या जीवा वर होते, तोच या सूक्ष्म मायेचा त्याग करू शकतो.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org